उन्हाळा सुरू झाला की थंडगार दही किंवा ताक असे पदार्थ दुपारच्या जेवणात खावेसे वाटतात. शिवाय गरमी खूप जास्त असते. त्यामुळे मग दुपारच्या जेवणात वेगवेगळ्या कोशिंबीर, रायतं असं काही असेल तर जेवणाची रंगत आणखी वाढत जाते. आता हे सगळे पदार्थ करायचे म्हटले की दही लागतंच.. त्यामुळे इतर कोणत्याही ऋतूपेक्षा उन्हाळ्यात जास्त दही खाल्लं जातं आणि नेमकं उन्हाळ्यात लावलेलं दही बऱ्याचदा खूपच आंबट आणि पातळ होऊन जातं. म्हणूनच ही एक सोपी ट्रिक पाहा (cooking tips for setting thick curd at home). या पद्धतीने जर तुम्ही दही लावलं तर ते अगदी विकतच्या दह्यापेक्षाही जास्त घट्ट हाेईल आणि शिवाय आंबटही नसेल. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं? (How To Set Thick And Sweet Curd At Home?)
घरी लावलेलं दही घट्ट आणि मधूर व्हावं यासाठी टिप्स..
घरी लावलेलं दही छान घट्ट व्हावं यासाठी काय करता येईल याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ aruna_vijay_masterchef या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
नाकावरचे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स खूप वाढले? २ सोपे उपाय- चेहरा होईल नितळ, स्वच्छ
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर साधारण अर्धा लीटर दूध तापवून ८ ते १० मिनिटे उकळवून घ्या.
यानंतर दूध जेव्हा कोमट होईल तेव्हा त्यामध्ये १ चमचा विरजण आणि दोन चमचे मिल्क पावडर घाला. आता रवी वापरून दूध व्यवस्थित घुसळून घ्या.
त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि साधारण ५ ते ६ तास ते तसंच ठेवा. त्याला वारंवार धक्का लावू नका किंवा मग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते नेऊ नका. यानंतर ते सेट होण्यासाठी एक ते दोन तास फ्रिजमध्ये ठेवून द्या.
१ मिनिटांत नारळ करवंटीच्या बाहेर येईल- कठीण वाटणारं काम हाेईल अगदी सोपं, करून पाहा
यानंतर जेव्हा तुम्ही दही फ्रिजमधून बाहेर काढाल तेव्हा ते अगदी घट्ट झालेलं असेल. शिवाय मिल्क पावडरमुळे त्यांची चव आणि टेक्स्चर दोन्हीही अधिक छान होईल.