Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेटीतले आंबे कच्चे निघालेत? नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्यासाठी ७ भन्नाट आयडिया - चवीला रसाळ आणि गोड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2026 18:54 IST

how to ripen raw mangoes at home : desi tricks to ripen mangoes fast : traditional Indian methods to ripen mangoes naturally : नैसर्गिकरित्या घरच्याघरी आंबे पिकवण्याच्या ७ स्मार्ट ट्रिक्स...

आंब्याचा सिझन सुरू झाला की, बाजारातून गोड, रसाळ आंबे विकत आणण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. फळांचा राजा असलेल्या आंब्याची चव चाखण्यासाठी आपण वर्षभर वाट पाहत असतो. बाजारात आंब्याची आवक सुरू झाली की आपण उत्साहाने मोठ्या हौसेनं आंबे विकत घेतो, पण अनेकदा आंबे पूर्णपणे पिकलेले नसतात. घाईघाईने रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. कच्चे आंबे खाल्ल्यावर चवही अपेक्षित मिळत नाही आणि अनुभव खराब होतो. अशावेळी केमिकल्सचा वापर टाळून घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवणं हा सर्वात सुरक्षित आणि चांगला पर्याय ठरतो(how to ripen raw mangoes at home).

कच्चे आंबे खाल्ल्यावर चवही हवी तशी लागत नाही आणि आंबा (desi tricks to ripen mangoes fast) खाण्याचा हिरमोड होतो. अशावेळी केमिकल्सचा वापर टाळून घरच्याघरी नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवणं हा सर्वात सुरक्षित आणि चांगला पर्याय ठरतो. पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धती वापरून घरच्याघरी आंबे पिकवणे सर्वात सुरक्षित असते. यामुळे आंब्याचा नैसर्गिक गोडवा आणि सुगंध तर टिकून राहतोच, शिवाय ते खाण्यासाठीही आरोग्यदायी असतात. सोप्या घरगुती उपायांनी (traditional Indian methods to ripen mangoes naturally) आंबे पटकन आणि नैसर्गिकरित्या कसे पिकवता येतील ते पाहूयात. 

कच्चे आंबे घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यासाठी खास टिप्स... 

१. तांदळाचा डबा :- तांदळामध्ये नैसर्गिक उष्णता असते. कच्चे आंबे तांदळाच्या डब्यात पूर्णपणे आत रोवून ठेवल्यास ते २ ते ३ दिवसांत ते व्यवस्थित पिकतात. तांदळातील इथिलीन गॅसमुळे आंबे लवकर पिकण्यास मदत होते.

वेटलॉस करताना आंबा खा मनसोक्त! दिवसाला किती आणि कधी आंबा खावा? पोटभर खाऊनही वाढणार नाही वजन... 

२. वर्तमानपत्राचा वापर :- प्रत्येक आंबा स्वतंत्रपणे वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून ठेवा. त्यानंतर हे आंबे एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये किंवा टोपलीत भरून ठेवा. वर्तमानपत्र आंब्यातील ओलावा शोषून घेते आणि निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे आंबे छान पिकतात.

३. गवताचा वापर (अढी घालणे) :- जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात आंबे असतील, तर लाकडी पेटीत किंवा टोपलीत खाली सुके गवत (पेंढा) पसरवा. त्यावर आंबे मांडून पुन्हा वरून गवताचा थर द्या. या पारंपारिक पद्धतीमुळे आंब्याला नैसर्गिक रंग आणि चव येते.

फिटनेस फ्रिक अक्षयकुमारला आवडते ‘तसे’ करा मँगो आइस्क्रिम, मनसोक्त खाऊनही वजन वाढणार नाही...

४. कांदा किंवा लसणाचा डबा :- कांदा किंवा लसूण ठेवण्याच्या टोपलीत कच्चे आंबे ठेवल्यास त्यातील विशिष्ट गंध आणि उष्णतेमुळे आंबे पिकण्याची प्रक्रिया वेगवान होते. मात्र, आंबे जास्त दिवस त्यात ठेवू नका, अन्यथा त्याचा वास फळाला लागू शकतो.

५. कापडी पिशवी :- आंबे सुती कापडी पिशवीत बांधून उबदार ठिकाणी (उदा. किचनमधील ओट्याखाली किंवा कपाटात) ठेवा. यामुळे आंब्याला बाहेरची हवा लागत नाही आणि नैसर्गिक उष्णतेने आंबा पिकतो.

६. केळी किंवा सफरचंदासोबत ठेवा :- आंबे लवकर पिकवण्यासाठी हा एक अतिशय स्मार्ट आणि सोपा उपाय आहे. केळी आणि सफरचंद यांसारख्या फळांमध्ये नैसर्गिकरित्या 'इथिलीन' नावाचा वायू तयार होत असतो, जो फळे पिकण्याच्या प्रक्रियेला गती देतो. जर तुम्ही कच्चे आंबे केळी किंवा सफरचंदासोबत एका कागदी पिशवीत किंवा बॉक्समध्ये ठेवले, तर या फळांमधून निघणारा इथिलीन गॅस आंब्याला नैसर्गिक पद्धतीने आणि झटपट पिकवण्यास मदत करतो.

७. उबदार आणि कोरड्या जागी ठेवा :- आंबे पिकवण्यासाठी योग्य तापमानाची आवश्यकता असते. आंबे कधीही फ्रिजमध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवू नका, कारण यामुळे त्यांच्या पिकण्याची प्रक्रिया थांबते आणि चवही बिघडते. त्याऐवजी, आंबे घरातील किंचित उबदार आणि कोरड्या जागी ठेवा. उबदार ठिकाणी ठेवल्यामुळे आंब्यामध्ये नैसर्गिक उष्णता निर्माण होते आणि पिकण्याची प्रक्रिया जलद होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Raw mangoes? 7 natural ways to ripen mangoes at home.

Web Summary : Bought raw mangoes? Here are seven natural methods to ripen them at home. Use rice, newspaper, or hay. Keep with bananas or apples. Avoid chemicals for sweet, juicy results.
टॅग्स :अन्नआंबाफळेउन्हाळासमर स्पेशल