How to ripen bananas naturally : केळं हे एक असं फळ आहे ज्याची मुलायम आणि गोड टेस्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. सोबतच हे फळ शरीरासाठी फायदेशीर आणि एनर्जी देणारं आहे. पण अलिकडे बाजारात केमिकलद्वारे पिकवलेली मिळतात. ज्याचे फारसे फायदे मिळत नाहीत, टेस्टही चांगली नसते किंवा काही वेळेला तर ती खाऊन तब्येतही बिघडू शकते. जर आपल्याला केमिकलयुक्त केळी खायची नसतील आणि तब्येतही सांभाळायची असेल, तर घरीच केळी नॅचरली पिकवू शकता. आता कच्ची केळी घरी कशा पिकवायच्या? असा प्रश्न पडला असेल तेच आज आपण पाहणार आहोत.
पेपर बॅग
कच्ची केळी एका पेपर बॅगेमध्ये ठेवा आणि ती नीट बंद करा. पेपर बॅगेमध्ये एथिलीन नावाचा नैसर्गिक वायू साचतो, जो पिकवण्याची प्रक्रिया फास्ट करतो. हवं तर त्यात एक सफरचंद किंवा टोमॅटोही किंवा अक्रोडही ठेवू शकता. यातूनही एथिलीन नावाचा वायू निघतो, ज्यामुळे केळी पिकण्यास मदत मिळते.
तांदूळ किंवा पीठाच्या डब्यात ठेवणे
कच्ची केळी तांदळाच्या किंवा पीठाच्या डब्यात दाबून ठेवा. या बंद डब्यात नैसर्गिक उष्णता निर्माण होते, ज्यामुळे केळी पटकन पिकतात.
केळी खोलीच्या तापमानावर ठेवणे
जर काही घाई नसेल, तर केळी फक्त खोलीच्या तापमानावर उघडी ठेवली तरी काही दिवसांत हळूहळू पिकतात.
ओव्हनचा वापर
जर लगेच खायची असेल असेल, तर केळी ओव्हनमध्ये ठेऊन काही मिनिटे गरम करू शकता. पण ही पद्धत नैसर्गिक नाही आणि फक्त इमरजन्सीमध्ये वापरावी.
काय काळजी घ्याल?
केळी प्लास्टिकच्या बॅगेत केळी ठेवू नका, कारण त्यात हवा खेळती राहत नाही. नैसर्गिक पद्धतीने पिकलेली केळीच खाण्यासाठी उत्तम मानली जातात. केळ्याचा रंग गडद पिवळा किंवा किंचित तपकिरी ठिपके आले की ती खाण्यास तयार आहेत, असं समजा.