Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > इडली साच्याला चिकटते, आकार बिघडतो? ९ सोप्या टिप्स - इडली साच्यातून सहज सुटेल, तुटणारही नाही...

इडली साच्याला चिकटते, आकार बिघडतो? ९ सोप्या टिप्स - इडली साच्यातून सहज सुटेल, तुटणारही नाही...

How to Remove Idli from the Idli Stand Without Sticking : how to remove idli from idli stand without sticking : how to prevent idli from sticking : इडल्या साच्यातून सहज न तुटता आणि एकदम परफेक्ट आकारात निघण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 17:50 IST2025-12-05T17:36:19+5:302025-12-05T17:50:42+5:30

How to Remove Idli from the Idli Stand Without Sticking : how to remove idli from idli stand without sticking : how to prevent idli from sticking : इडल्या साच्यातून सहज न तुटता आणि एकदम परफेक्ट आकारात निघण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहा...

How to Remove Idli from the Idli Stand Without Sticking how to remove idli from idli stand without sticking how to prevent idli from sticking | इडली साच्याला चिकटते, आकार बिघडतो? ९ सोप्या टिप्स - इडली साच्यातून सहज सुटेल, तुटणारही नाही...

इडली साच्याला चिकटते, आकार बिघडतो? ९ सोप्या टिप्स - इडली साच्यातून सहज सुटेल, तुटणारही नाही...

'इडली' हा दक्षिण भारतीय पदार्थ संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. मऊसूत, पांढरीशुभ्र, लुसलुशीत इडली हा सगळ्यांचा आवडता, हलका आणि हेल्दी पदार्थ. सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचे जेवण, गरमागरम इडल्या खाण्याची मजा काही औरच असते! पण अनेकदा गृहिणींची तक्रार असते की, इडल्या व्यवस्थित फुगतात, छान मऊ होतात; पण त्या साच्याला चिकटून राहतात. साच्यातून काढताना त्या तुटतात किंवा त्यांचा आकार बिघडतो. यामुळे पूर्ण मेहनत वाया गेल्यासारखे वाटते. इडली करायला घेतली की, साच्याला चिकटते, सहज निघत नाही किंवा काढताना तुटते. अगदी परफेक्ट पीठ असूनही फक्त साच्यामुळे इडलीचा आकार आणि टेक्शचर खराब होते, अशावेळी स्वयंपाक करताना अनेकींची फार चिडचिड होते(How to Remove Idli from the Idli Stand Without Sticking).

इडल्या साच्याला का चिकटतात? यासाठी इडलीच्या पिठाचे टेक्शचर, इडली तयार करण्यासाठी साचा तयार करणे आणि वाफवण्याची योग्य पद्धत महत्त्वाची असते. इडल्या साच्याला (how to prevent idli from sticking) अजिबात न चिकटता, अगदी सहजपणे बाहेर पडाव्यात आणि त्यांचा आकार टिकून राहावा, यासाठी काही सोपे उपाय पाहूयात. हे उपाय वापरून आपण नेहमीच हॉटेलसारख्या मऊ, लुसलुशीत आणि साच्यातून पटकन निघणाऱ्या इडल्या झटपट तयार करू शकता. इडल्या साच्यातून सहज, न तुटता आणि एकदम परफेक्ट (how to remove idli from idli stand without sticking) आकारात बाहेर येण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहा... 

इडल्या न तुटता, साच्याला न चिकटता पटकन निघण्यासाठी टिप्स... 

१. इडलीच्या प्रत्येक साच्याला इडलीचे पीठ भरण्यापूर्वी अगदी हलका तेलाचा किंवा तुपाचा हात फिरवा. जास्त तेल लावू नका. साच्याच्या आतला भाग फक्त तेलाच्या पातळ थराने कोट झाला पाहिजे, यामुळे इडली शिजल्यावर साच्यातून अलग होते.

२. इडलीचे पीठ जास्त पातळ नसावे. पीठ जर खूप पातळ झाले, तर ते साच्याच्या कडांना जास्त चिकटते आणि वाफेवर व्यवस्थित सेट होत नाही, त्यामुळे काढताना तुटते. इडलीचे पीठ नेहमी डोसा पिठापेक्षा थोडे जाड (घट्ट) असावे. ते चमच्यातून सहज पडेल, पण पाण्याच्या धारेसारखे पातळ नसावे.

३. इडल्या वाफेवर शिजल्यानंतर लगेच साचे बाहेर काढा, पण इडल्या काढायला लगेच सुरुवात करू नका. इडली साचे बाहेर काढून १ ते २ मिनिटे तसेच थंड होऊ द्या. गरम इडली जास्त चिकट असते. थंड झाल्यावर ती साच्याच्या कडा सोडते आणि साच्याला न चिकटता सहजपणे बाहेर येते.

जिभेवर ठेवताच विरघळेल! अस्सल कोकणी चवीची 'खापरोळी' करण्याची पारंपरिक रेसिपी - मऊ, लुसलुशीत गोडाचा पदार्थ... 

हिवाळ्यात मौसमी भाज्यांचं लोणचं म्हणजे वर्षभराच्या आनंदाचा खजिना! पाहा भाज्यांच्या लोणच्याची पारंपरिक रेसिपी...

४. जर इडल्या खूपच चिकटत असतील, तर इडलीचे साचे बाहेर काढल्यानंतर, ते साचे थंड पाण्याच्या भांड्यात फक्त काही सेकंदांसाठी भिजवा. अचानक तापमान बदलल्यामुळे इडली साच्याच्या कडा सोडते आणि तुम्ही ती पटकन काढू शकता.

५. इडल्या थोड्या थंड झाल्यावर, इडली काढण्यासाठी चमच्याने किंवा सुरीने इडलीच्या कडा हळूवारपणे सैल करा. कडा सैल झाल्यावर चमचा हळूवारपणे इडलीच्या खाली घाला आणि ती अलगद बाहेर काढा. यामुळे इडलीचा आकार कायम राहतो आणि त्या साच्याला न चिकटता लगेच निघतात. 

६. इडली नेहमी मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे वाफेवर शिजवा. जर जास्त शिजवली तर त्या कडक होतात आणि साच्याला चिकटतात. इडली पात्रामध्ये  पाण्याची पातळी साच्याच्या सर्वात खालच्या प्लेटला स्पर्श करणार नाही इतकीच ठेवा. इडली पात्रातून चांगली वाफ बाहेर पडू लागल्यावरच साचा आत ठेवा.

लहानशा कुंडीत आलं लावण्याची पाहा सोपी युक्ती, घरीच मिळेल ताजं कोवळं आलं- हिवाळ्यात चहा-सूप होईल स्पेशल...

७. साच्यामध्ये पीठ पूर्णपणे भरू नका. इडली फुगण्यासाठी वरच्या बाजूला किंचित जागा (थोडी मोकळी) सोडा. जर साचा पूर्ण भरला तर इडली फुगल्यावर तुटून साच्याला चिकटते.

८. साचा भरताक्षणी वाफेवर ठेवू नका. भरल्यानंतर २ ते ३ मिनिटे बाहेर ठेवा, त्यामुळे वरची लेयर सेट होते आणि इडल्या साच्याला चिकटत नाही.

९. जर स्टील साचा नेहमीच चिकटत असेल तर सिलिकॉन इडली मोल्ड वापरा, इडल्या हाताने ढकलल्या तरी सहज बाहेर पडतात.

Web Title: How to Remove Idli from the Idli Stand Without Sticking how to remove idli from idli stand without sticking how to prevent idli from sticking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.