Join us

दही खूप आंबट झाल्यास काय करावं? २ टिप्स- आंबटपणा जाऊन दही होईल गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2025 09:25 IST

Tips And Tricks To Reduce Sourness Of Curd: आंबट झालेलं दही खाल्लं जात नाही. म्हणूनच दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा..(how to turn sour curd into sweet curd?)

ठळक मुद्देआंबट दह्याची चव थोडी सुधारण्यासाठी आणि त्याला थोडी गोडी आणण्यासाठी हे काही उपाय तुम्ही करून पाहू शकता..

विकतचं दही रोज घेऊन खाण्यापेक्षा अनेक जण घरी तयार केलेलं दही खाण्यास जास्त प्राधान्य देतात. आरोग्याच्या दृष्टीनेही घरी नैसर्गिकपणे केलेलं दही खाणंच योग्य आहे. पण उन्हाळ्यात बऱ्याचदा असं होतं की घरी दही लावलं की ते खूप लवकर आंबट होतं. असं आंबट झालेलं दही मग अजिबात खाल्लं जात नाही. अशावेळी ते दही टाकून द्यावंसंही वाटत नाही किंवा त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करायलाही आपल्याकडे वेळ नसतो (how to reduce sourness of curd?). म्हणूनच त्या आंबट दह्याची चव थोडी सुधारण्यासाठी आणि त्याला थोडी गोडी आणण्यासाठी हे काही उपाय तुम्ही करून पाहू शकता..(how to turn sour curd into sweet curd?)

 

दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी काय उपाय करावे?

दही जर खूपच आंबट झालं असेल तर त्यासाठी दही एका सुती कपड्यामध्ये घ्या आणि कपडा घट्ट आवळून दह्यातलं जास्तीचं पाणी काढून टाका. आंबट पाणी निघून गेल्यावर दह्याचा आंबटपणा बऱ्यापैकी कमी होतो.

साडी नेसल्यावर कशी हेअरस्टाईल करावी? आलिया भटकडून घ्या आयडिया

वरील उपाय करून पाहिल्यानंतरही जर दह्याचा आंबटपणा कमी झाला नाही तर तो घट्ट चक्का दह्याचा गोळा अगदी ५ ते १० सेकंदासाठी पाण्यामध्ये घाला आणि लगेच पाण्यातून अलगदपणे काढून घ्या. यानंतरही दह्याचा आंबटपणा कमी होतो.

 

आता तुम्हाला जर आणखी थोडं मधूर चवीचं दही पाहिजे असेल किंवा वरील दोन्ही उपाय करूनही दह्याचा आंबटपणा तुम्हाला पाहिजे तेवढा कमी झाला नसेल तर दही एका पातेल्यामध्ये घ्या.

शरीरातलं व्हिटॅमिन D नैसर्गिकपणे वाढविण्याचे ३ उपाय- कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 सुद्धा वाढेल

त्या पातेल्यामध्ये जेवढं दही असेल त्याच्या अर्धे दूध घाला. दही, दूध व्यवस्थित हलवून घ्या आणि पातेल्यावर झाकण ठेवा. २ ते ३ तासांत हे दही छान सेट होईल आणि त्याचा आंबटपणा कमी होईल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सदूध