नारळ फोडणं ( Coconut Opening Hacks) म्हणजे खूपच किचकट काम. कधी कधी तर नारळ फोडताना हाताला लागण्याचाही धोका असतो (Cooking Hacks). स्वंयपाकात नारळाचा वापर करायचा म्हणजे तो फोडावाच लागतो. आधीच फोडून ठेवलेले नारळ विकत घेतल्यास ते फ्रेश आहेत की नाही असा प्रश्न पडतो. नारळ फोडण्याचं अवघड काम सोपं करण्यासाठी काही टिप्स पाहूया. (How To Remove Coconut From Coconut Shell)
नारळाच्या शेंड्या काढा
नारळ फोडण्यापूर्वी त्याच्या बाहेरील शेंड्या पूर्णपणे काढून टाका. यामुळे नारळाच्या कवचावर जोर लावणं सोपं जातं आणि नारळ लवकर फुटतो. नारळाच्या कवचावर नैसर्गिकरित्या तीन उभ्या रेषा किंवा डोळे असतात. हे नारळाचे कमकुवत बिंदू असतात. नारळ फोडण्यासाठी या तीन रेषांचा वापर करा.
एका जाड लाटण्याच्या मदतीनं किंवा मुसळीच्या साहाय्यानं या तीन रेषांवर मारा. काही वेळानंतर कोणत्याही दोन रेषांच्या मध्यभाही थोडा जास्त जोर लावून मारा. नारळ सहजपणे दोन समान भागांमध्ये फुटेल. नारळ फोडताना त्याचे पाणी एका भांड्यात गाळणीच्या मदतीनं लगेच जमा करा.
गॅसवर ठेवा
नारळ फुटल्यानंतर आतील पांढरे खोबरे कवटीतून सहज वेगळे करण्यासाठी ही युक्ती वापरा. गॅसवर मंद आचेवर फुटलेले तुकडे कवटीच्या बाजूनं वर ठेवा. एक ते दोन मिनिटं नारळाची वाटी गरम होऊ द्या. गरम झाल्यामुळे आतील खोबऱ्याचा भाग कवटीपासून आपोआप सुटायला लागेल. गॅस बंद करा नंतर थंड झाल्यावर एका चमच्यानं किंवा सुरीच्या मदतीनं खोबऱ्याची पूर्ण वाटी कवटीतून सहज बाहेर काढा. या सोप्या ट्रिक्सने तुमचं काम सोपं होईल आणि नारळ फुटून पांढरं शुभ्र खोबरं हातात येईल.
फ्रिजमध्ये ठेवा
नारळातून पाणी काढल्यानंतर तो रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. गोठल्यामुळे नारळाचे कवच कमकुवत होते. आणि खोबरं आकुंचन पावते. सकाळी फ्रिजरमधून काढून हातोडीनं हलक्या हातानं मारल्यास नारळ सहज फुटेल आणि खोबरंही सहज बाहेर येईल. या सोप्या आणि सुरक्षित ट्रिक्सचा वापर करून ओलं नारळ फोडल्यास तुमची समस्या नक्कीच दूर होईल. आता तुम्ही कमी वेळेत ताजं खोबरं काढून तुमच्या पदार्थांची चव वाढवू शकता.
