Methi Paratha Recipe : हिवाळ्यात गरमागरम मेथीचे पराठे खायला सगळ्यांनाच आवडतात. पण मेथीच्या पानांचा हलका कडूपणा कधी कधी पराठ्यांची टेस्ट बिघडवतो. अशात ही समस्या दूर करण्यासाठी आपण एक सोपा उपाय करू शकतो. ज्यामुळे मेथीच्या पराठ्यातील कडूपणा कमी होईल. जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा एक गोष्ट त्यात टाकली तर मेथीचे पराठे आणखीन टेस्टी होतील.
चला जाणून घेऊया सोपी आणि परफेक्ट रेसिपी!
मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
ताजी मेथी – 1 कप (बारीक चिरलेली)
गव्हाचे पीठ – 2 कप
दही – 2 ते 3 मोठे चमचे
हिरवी मिरची – 1–2 (बारीक चिरलेली)
आले – 1 छोटा तुकडा (किसलेले)
लाल तिखट – ½ चमचा
हळद – ½ चमचा
धणे पावडर – ½ चमचा
ओवा – ½ चमचा
मीठ – चवीनुसार
तेल/तूप – पराठे शेकण्यासाठी
मेथीचे पराठे बनवण्याची पद्धत
आधी एका मोठ्या भांड्यात पीठ घ्या आणि त्यात दही घालून चांगले मिसळा. दही घातल्यामुळे मेथीचा कडूपणा कमी होतो. पराठे मुलायम आणि स्वादिष्ट बनतात.
पीठ मळताना त्यात मेथी, ओवा, आले, हिरवी मिरची, मसाले आणि मीठ घाला. थोडे थोडे पाणी घालत मऊसर पीठ मळा आणि 10 मिनिटे झाकून ठेवा. नंतर पीठाचे गोळे करून पराठे पातळ बेलून घ्या. तवा गरम करून त्यावर तेल किंवा तूप घाला आणि पराठे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. तयार पराठे दही, लोणचे किंवा लोण्यासोबत सर्व्ह करा. आता मेथीचे पराठे कडवट नाही, तर एकदम भन्नाट चवदार बनतील!
मेथीचे आरोग्यदायी फायदे
मेथीत फायबर, आयर्न, व्हिटामिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. इतकंच नाही तर डायबेटीस असणाऱ्यांसाठी मेथी एक उत्तम ऑप्शन आहे. मेथीतील अँटी-ऑक्सिडंट्स आणि फाइबर वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
