बरेचदा घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आला की आपण हॉटेलमधून लगेच जेवण ऑर्डर करतो. काहीवेळा काहीतरी वेगळं खावंसं वाटलं की आपण पिझ्झा, रोटी, भाजी किंवा बिर्याणी असे वेगवेगळे पदार्थ हमखास बाहेरुन मागवून चवीने खातो. शक्यतो हॉटेलमधून विकत आणलेले पिझ्झा, रोटी, नान किंवा बिर्याणी असे पदार्थ एकदा मागवले की संपल्याशिवाय राहत नाही. असे चमचमीत, मसालेदार पदार्थ समोर येताच फस्त केले जातात. फार क्वचित वेळीच असं होत की पिझ्झा, रोटी, नान किंवा बिर्याणी शिल्लक राहिली आहे(How To Reheat Pizza, Naan & Rice Without Making it Soggy or Dry).
हे उरलेले अन्नपदार्थ आपण फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खातो. परंतु दुसऱ्या दिवशी फ्रिजमधून काढून गरम केलेल्या या सगळ्याचं पदार्थांची चव आधीसारखी लागत नाही. तसेच तो शिळा पिझ्झा किंवा रोटी, नान वारंवार गरम केल्यामुळे त्याचा बेस काहीवेळा करपू शकतो किंवा असे पदार्थ चवीला वेगळे लागू शकतात. एवढंच नाही तर उरलेला भात देखील आपण पुन्हा गरम केल्यास तो भांड्याच्या तळाशी जाऊन चिकटतो. अशावेळी उरलेला पिझ्झा, रोटी, नान किंवा भात पुन्हा गरम करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूयात.
उरलेला पिझ्झा, रोटी, नान किंवा भात पुन्हा गरम करण्याच्या सोप्या ट्रिक्स...
१. पिझ्झा :- सर्वप्रथम एक पॅन घेऊन त्यावर झाकण ठेवून तो २ ते ३ मिनिटे प्री - हिट करून घ्यावा. प्री - हिट केल्यानंतर त्या पॅनचे झाकण उघडून त्यात उरलेल्या पिझ्झ्याचे तुकडे ठेवावेत. हे पिझ्झाचे (The Best Ways to Reheat Leftover Pizza) तुकडे पॅनमध्ये ठेवल्यानंतर त्यात १ ते २ बर्फाचे खडे घालून परत पॅनवर झाकण ठेवावे. आता गॅसच्या मंद आचेवर हा पिझ्झा गरम करून घ्यावा. लक्षात ठेवा पॅनमध्ये घातलेले बर्फाचे खडे वाफेने संपूर्णपणे वितळेपर्यंत पिझ्झा मंद आचेवर गरम करून घ्यावा. पिझ्झा गरम करताना आपण बर्फासोबतच त्यावर थोडेसे पाणीदेखील शिंपडू शकतो. जर आपण अशा पद्धतीने पिझ्झा गरम केला तर त्याचा बेस करपून न जाता तो सगळ्या बाजुंनी व्यवस्थित गरम होतो. तसेच त्यावर घातलेले चीझ देखील व्यवस्थित वितळून हा फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा पिझ्झा पुन्हा खाण्यासाठी तयार असतो.
कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल!
२. भात किंवा बिर्याणी :- फ्रिजमधून काढलेला थंडगार भात (How to Make Leftover Rice Fresh) सुकून, कडक होतो. असा भात पुन्हा गरम करताना तो भांड्यांच्या तळाशी चिकटतो. असे होऊ नये यासाठी आपण एक भांड घेऊन त्यात पाणी ओतून ते व्यवस्थित उकळवून घ्यावे. या उकळलेल्या पाण्यावर एक जाळीदार गाळण किंवा चाळणी ठेवावी. त्यानंतर त्यात हा भात पसरवून व्यवस्थित घालावा. त्यानंतर वरुन झाकण ठेवून भात झाकून घ्यावा. अशा पद्धतीने भात फक्त वाफेवर गरम करून घ्यावा. यामुळे भात भांड्यांच्या तळाशी न चिकटता व्यवस्थित गरम होतो.
३. रोटी किंवा नान :- रोटी किंवा नान (How to Make Leftover Naan Fresh and Crispy in 2 Minutes) गरम करताना काहीवेळा ते फारच कडक होतात किंवा तव्याला चिकटतात. यासाठी सर्वात आधी एक पॅन घेऊन त्यावर तेल किंवा तूप सर्वत्र पसरवून लावावे. त्यानंतर त्यावर ४ ते ५ थेंब पाणी शिंपडून मग रोटी किंवा नान ठेवून वरुन झाकण ठेवावे. अशा पद्धतीने उरलेले रोटी किंवा नान पुन्हा गरम केल्यास ते कडक न होता किंवा तव्याला न चिकटता पुन्हा व्यवस्थित गरम केले जातात.
पराठा कोणताही असो मसाला घाला एकच! चिमूटभर मसाला पराठा करेल टेस्टी, शाळेचा डबा संपेल पटकन...