Lokmat Sakhi >Food > सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...

सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...

How to store Mangoes for more than a year : How to store Aamras for a long time : How to freeze mango for later use : How to preserve mangoes beyond the summer season : आंब्याचा सिझन संपला तरी देखील पुढचे काही महिने आंब्याच्या चवीचा आस्वाद घेऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 15:02 IST2025-05-29T14:48:24+5:302025-05-29T15:02:35+5:30

How to store Mangoes for more than a year : How to store Aamras for a long time : How to freeze mango for later use : How to preserve mangoes beyond the summer season : आंब्याचा सिझन संपला तरी देखील पुढचे काही महिने आंब्याच्या चवीचा आस्वाद घेऊ शकतो.

How to preserve mangoes beyond the summer season How to store Mangoes for more than a year How to store Aamras for a long time How to freeze mango for later use | सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...

सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...

सध्या ऐन मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली असल्याने, यंदा आंब्याचा मोसम अगदी लवकर संपला असे वाटत आहे. एरवी जूनमध्ये येणारा पाऊस मे महिन्यातच पडल्याने (How to store Mangoes for more than a year) आंब्याचे फारच नुकसान झाले आहे. मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली असल्याने ( How to store Aamras for a long time) आंब्याचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा फळांचा राजा ( How to freeze mango for later use) असला, चवीला गोड आणि खायला टेस्टी असला तरी आंब्याचा सिझन हा काही दिवसांपुरताच असतो. एकदा पावसाळा सुरू झाला की बाजारातून हा पिवळाधम्मक, गोड चवीचा आंबा हळूहळू गायब होऊ लागतो(How to preserve mangoes beyond the summer season).

आंब्याचा सिझन संपत आला की आपल्यापैकी बऱ्याच आंबाप्रेमींना फार दुःख होते. आंब्याचा सिझन कधी संपूच नये आणि आपल्याला वर्षभर आंब्याची चव अशीच चाखता यावी असे मनोमन वाटते. यासाठीच,आंबा स्टोअर करून ठेवल्यास, आपण आंब्याचा सिझन संपला तरी देखील पुढचे काही महिने आंब्याच्या चवीचा आस्वाद घेऊ शकतो. यासाठी नेमकं करायचं काय आहे आंब्याच्या फोडी खराब न होता पुढचे काही महिने कशा स्टोअर करुन ठेव्याच्या ते पाहूयात.

आंब्याच्या फोडी व आमरस असे करा स्टोअर... 

आपल्यापैकी बरेचजण पाऊस पडला की आंबा खाणं सोडून देतात किंबहुना, पाऊस पडल्यावर बाजारात आंबा फारच कमी प्रमाणात विकायला येतो. अशावेळी आंब्याचा सिझन संपत आला की, आपण पुढील काही महिने आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी आंब्याच्या फोडी स्टोअर करुन देखील ठेवू शकतो. यासाठी, आपल्याला फक्त आंबे आणि साखर इतक्या दोनच पदार्थांची गरज लागणार आहे. आंब्याचा सिझन संपत आल्यावर आंबा कसा स्टोअर करायचा याची सोपी ट्रिक इंस्टाग्रामवरील kotharip39 व mummascake_by_mahek या अकाउंटवरूनशेअर करण्यात आली आहे. 

१. आंब्याच्या फोडी :- सर्वातआधी एक स्टील किंवा प्लॅस्टिकचा डबा घ्यावा. डबा शक्यतो उभट आकाराचा असेल तर उत्तम कारण, यात एकाचवेळी जास्त प्रमाणात अगदी व्यवस्थितपणे आंब्याच्या फोडी स्टोअर करता येतात. मग चांगल्या दर्जाचे आंबे घेऊन ते सर्वातआधी स्वच्छ धुवून आणि २ ते ३ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यानंतर आंब्याच्या थोड्या मोठ्या आकाराच्या फोडी चिरुन घ्याव्यात. आता, डब्याच्या तळाशी आंब्याच्या फोडी ठेवून त्याचा थर लावून घ्यावा. मग त्यावर १ टेबलस्पून साखर भुरभुरवून घालावी. त्यानंतर परत आंब्याच्या फोडींचा एक थर लावून त्यावर साखर घालावी. अशा पद्धतीने एकावर एक आंब्याचे थर आणि साखर पसरवून घालावी. सगळ्यात शेवटी डबा भरल्यावर झाकण लावून हा डबा फ्रिझरमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवून द्यावा. 

शिळ्या पोळ्यांची करा मस्त गोड खीर! चवीला उत्तम आणि पौष्टिक पदार्थ - चव एकदा चाखून तर पाहा...


रविवारी नाश्त्याला करा 'मलई ब्रेड विथ चाय', खास दुबई स्पेशल! घरच्याघरी करा दुबईची व्हायरल रेसिपी...

२. आमरस :- आंब्याच्या रस स्टोअर करून ठेवण्यासाठी सर्वात आधी मिक्सरमधून आंब्याचा रस काढून घ्यावा. मग हा आंब्याचा रस एका झिपलॉक बॅगमध्ये भरून त्या पिशवीचे तोंड व्यवस्थित सीलपॅक करून घ्यावेत. आमरस करताना आंब्याच्या रसात देखील थोडी साखर घालावी. साखर घातल्याने पुढील ४ ते ५ महिने देखील आंब्याच्या चवीत काहीच बदल होत नाही. याचबरोबर, साखर नॅचरल प्रिझर्व्हेटिव्ह्ज म्हणून काम करते, यामुळे आमरस किंवा आंब्याच्या फोडी खराब न होता दीर्घकाळ टिकून राहतात. अशाप्रकारे आपण आंब्याचा सिझन संपला तरी देखील आंब्याच्या फोडी किंवा आमरसाचा पुढील ४ ते ५ महिने आस्वाद घेऊ घेऊ शकतो.

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...


 

Web Title: How to preserve mangoes beyond the summer season How to store Mangoes for more than a year How to store Aamras for a long time How to freeze mango for later use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.