भारतात चहा हे फक्त एक पेय नाही तर ती एका भावना आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते, काहींचा तर चहा शिवाय दिवसच जात नाही. चहा हा अनेकांचा जीव की प्राण असतो, विशेषतः थंडीमध्ये तर चहा पिण्याची मज्जा काही औरच असते. चहा प्यायची तलफ लागली की हातात चहाचा कप आला की जीवन सार्थकी लागल्यासारखंच वाटत. खरंतर, चहाचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच प्रत्येक घरोघरी चहा तयार करण्याची पद्धत देखील प्रत्येकाची वेगवेगळी असते. कुणाला मसाला चहा आवडतो तर कुणाला कोरा चहा, कुणाला दूध घातलेला तर कुणाला आलं - गवती चहा घातलेला चहा आवडतो(how to make world’s best chai with Chef Ranveer Brar secret).
चहाचे प्रकार, चव वेगवेगळी असली तरी वेळेला चहा मिळाला की अगदी सुख वाटत. सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार, यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला की, जगातील सर्वोत्तम चहा कसा तयार करतात ? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, "माझे पापाजी बनवतात, ज्याची रेसिपी यूट्यूबवर आहे." सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार यांनी सांगितलेली रेसिपी थोडी विशेष आहे. सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार (chef ranveer brar chai recipe) याने मुलाखतींमध्ये आणि यूट्यूब चॅनलवर सांगितले की, त्यांच्या 'पापाजीं'नी बनवलेला चहाच सर्वात उत्तम असतो. या प्रसंगी त्यांनी चहामध्ये दूध घालण्याची योग्य वेळ आणि पद्धत याचाही उल्लेख केला. जर तुम्हालाही परफेक्ट चहा बनवायचा असेल, तर ही रेसिपी पहा...
घरच्याघरीच वर्ल्ड बेस्ट चहा करण्याची अचूक पद्धत...
१. पाणी उकळण्यापासून सुरुवात :- रणवीर ब्रार ४ कप चहा बनवण्यासाठी २ ते अडीच कप पाणी घेण्याचा सल्ला देतात. जेणेकरून दूध आणि पाण्याचे मिश्रण इतके घट्ट होऊ नये की चहाची खरी चव बदलून जाईल. सर्वप्रथम फक्त पाणीच व्यवस्थित उकळायचे आहे. जेव्हा पाणी उकळू लागेल, तेव्हाच पुढील साहित्य पाण्यांत घालायचे आहे. थंड पाण्यात कोणतेही साहित्य घालण्याची चूक करू नका.
हिवाळ्यात खा टम्म फुगलेली मसालेदार कोथिंबीर पुरी! पारंपरिक गरमागरम पदार्थ - खाऊन व्हाल खुश...
२. आले आणि चहा पावडर टाकणे :- चहाची चव चांगली होण्यासाठी पाण्यांत इतर साहित्य टाकण्याचा क्रम आणि वेळ हे सर्वात महत्वाची असते. पाणी उकळल्यानंतर, सर्वात आधी आले ठेचून घालावे. आल्याचा अर्क पाण्यात पूर्णपणे मिसळण्यासाठी त्याला थोडा वेळ शिजू द्या. यानंतर चहा पावडर घाला. चहा पावडर टाकल्यानंतर, ती २ ते ३ मिनिटे हळूहळू उकळू द्यावी, जेणेकरून चहा पावडरचा स्वाद पाण्यात चांगला मिसळून जाईल.
३. परफेक्ट चवीसाठी दूध घालण्याची पद्धत :- रणवीर बरार यांच्या चहाचे सर्वात मोठे सिक्रेट चहात दूध घालण्याच्या पद्धतीमध्ये दडलेले आहे.सामान्यतः आपण चहा पावडर टाकल्यानंतर लगेच थंड दूध घालतो, पण ब्रार याच्या अगदी विरुद्ध करण्याचा सल्ला देतात आणि शेवटी दूध घालण्याचा सल्ला देतात. त्यांचे म्हणणे आहे की, दूध थंड घालण्याऐवजी उकळून किंवा गरम करून घालावे. दूध शेवटी आणि गरम करून घातल्याने, चहा पावडरचा शिजलेला स्वाद आणि मसाल्याचा अर्क दुधासोबत त्वरित मिसळतो, ज्यामुळे चहाची चव 'परफेक्ट' आणि मलईदार होते.
४. साखर कधी घालावी :- साखर नेहमी दूध घालण्यासोबतच किंवा त्याच्या लगेच नंतर घालावी. कारण साखर विरघळण्यासाठी आणि चहाच्या चवीशी जुळवून घेण्यासाठी थोडी गरम पाण्याच्या उष्णतेची गरज असते. चवीनुसार साखरेचा वापर करा, पण हे लक्षात ठेवा की त्यामुळे चहाचा नैसर्गिक कडवटपणा पूर्णपणे नाहीसा होऊ नये.
५. खास सामग्रीचा वापर करा :- चहात फक्त आले किंवा वेलचीच नाही, तर रणवीर ब्रार यांनी चहाला सिझनलदृष्ट्या खास बनवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. उन्हाळ्यात चहामध्ये बडीशेप घालावी, कारण बडीशेपमध्ये शरीराला थंडावा देणारे गुणधर्म असतात. हिवाळ्यामध्ये जेष्ठमध पावडर घालावी ही पावडर सर्दी-खोकल्यामध्ये आराम देते आणि चहाला नैसर्गिक गोडवा व उबदारपणा देते, जो थंड वातावरणात शरीरासाठी अगदी आवश्यक असतो.
