Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चिरलेलं टरबूज नेहमीच खूप उरतं? 'या' पद्धतीने ज्यूस करून प्या, घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल

चिरलेलं टरबूज नेहमीच खूप उरतं? 'या' पद्धतीने ज्यूस करून प्या, घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल

Watermelon Juice Recipe: टरबूज चिरल्यावर बहुतांश वेळा ते उरतंच. त्यामुळे त्याचा ज्यूस कसा करायचा ते पाहून घ्या...(how to make watermelon juice?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2026 15:09 IST2026-04-04T15:08:43+5:302026-04-04T15:09:26+5:30

Watermelon Juice Recipe: टरबूज चिरल्यावर बहुतांश वेळा ते उरतंच. त्यामुळे त्याचा ज्यूस कसा करायचा ते पाहून घ्या...(how to make watermelon juice?)

how to make watermelon juice, watermelon juice recipe  | चिरलेलं टरबूज नेहमीच खूप उरतं? 'या' पद्धतीने ज्यूस करून प्या, घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल

चिरलेलं टरबूज नेहमीच खूप उरतं? 'या' पद्धतीने ज्यूस करून प्या, घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल

टरबूज हे अनेकांच्या अतिशय आवडीचं फळं. उन्हाळ्यात भरपूर टरबूज आलेली असतात. त्यामुळे सतत टरबूज आणून ते खाणं सुरूच असतं. पण ज्या कुटूंबात मोजके ३- ४ जणं राहतात त्यांना एक टरबूज खूप होतं. चिरल्यानंतर ते एका दिवसातच सगळं संपत नाही. त्यातलं बरंच उरतं. ते पुन्हा दुसऱ्यादिवशी खायला नको वाटतं. म्हणूनच एकदा टरबुजाच्या फोडी खा आणि नंतर उरलेल्या टरबुजाचा ज्यूस करून प्या. तो कसा करायचा याची ही खास रेसिपी...(how to make watermelon juice?)

टरबुजाचा ज्यूस कसा करायचा?

 

साहित्य

टरबुजाच्या ४ ते ५ वाट्या

१ संत्री

बॉडी डिटॉक्स करणारे ५ पदार्थ, शरीरातली घाण बाहेर फेकली जाऊन राहाल निरोगी, चेहऱ्यावर येईल तेज

१ टेबलस्पून सब्जा

चिमूटभर मीठ आणि १ चमचा मध

कृती

 

टरबुजामधल्या बिया काढून घ्या. तसेच संत्री सोलून त्याच्या साली आणि बिया वेगळ्या करा.

आता टरबुजाच्या फोडी, सोलून घेतलेलं संत्र मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात थोडं पाणी, मीठ आणि मध घाला. सगळं मिक्सरमधून अगदी बारीक फिरवून घ्या.

उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून गेली? 'या' पद्धतीने राईस फेशियल करा- टॅनिंग जाऊन चेहऱ्यावर येईल ग्लो

हा रस गाळून घ्या. ग्लास भरताना सगळ्यात खाली सब्जाचं पाणी घाला. त्यावर टरबुजाचा रस घाला. चवीसाठी तुम्ही त्यात थोडासा पुदिनाही घालू शकता. मिरेपूड, चाट मसाला किंवा काळं मीठ घालून हा ज्यूस प्यायल्यास अधिक चवदार लागतो. 


 

Web Title : तरबूज बच गया? जूस बनाएँ! सबके लिए एक ताज़ा रेसिपी।

Web Summary : बहुत ज़्यादा तरबूज है? उसे बर्बाद न करें! यह रेसिपी बचे हुए तरबूज को स्वादिष्ट जूस में बदल देती है। तरबूज, संतरा, सब्जा के बीज, एक चुटकी नमक और शहद मिलाकर एक ताज़ा पेय बनाएँ जो पूरे परिवार को पसंद आएगा।

Web Title : Leftover watermelon? Make juice! A refreshing recipe for everyone.

Web Summary : Too much watermelon? Don't let it go to waste! This recipe turns leftover watermelon into a delicious juice. Blend watermelon, orange, sabja seeds, a pinch of salt, and honey for a refreshing drink the whole family will love.