श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी अनेकजण उपवास करतात. या उपवासाच्या दिवसांत आपली प्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती देखील कमी होत असते. यासाठी पचायला सोपे असेलेले पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करणे महत्त्वाचे असते. बरेचजण प्रत्येक सोमवारी व शनिवारी निर्जळी उपवास करतात तसेच काही न खाता फक्त पूर्ण दिवस पाणी पिऊन देखील उपवास करतात. बऱ्याचवेळा उपवास म्हटला की, आपण साबुदाणा बटाटा यापासून तयार केलेली खिचडी, वडे, थालिपीठ असे पचायला जड असणारे व तेलकट पदार्थ (Fasting Recipe) खातो. परंतु उपवास करताना आपण आधीच उपाशी असतो, पोटात काही नसते अशा वेळी जड पदार्थ खाल्ले तर ते पचायला त्रास होतो. इतकेच नाही तर असे खाल्ल्याने, हेवी पदार्थ खाल्ल्याने उपवासाच्या दुसऱ्या दिवशी पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
उपवासाच्या पदार्थांमध्ये पचायला हलका, कमी तेलकट, खायला चविष्ट असा झटपट होणारा पदार्थ म्हणजे वरईचा पुलाव (Vari Pulao Recipe). नेहमी आपण वेगवेगळ्या भाज्या मसाले घालून पुलाव बनवतो. परंतु उपवासाला अगदी कमी साहित्यात चटकन (Quick Fasting Vari Pulao Recipe) तयार होणारा आणि खायला साबुदाणा आणि बटाट्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणून वरईचा पुलाव (Vari Pulao) हा उत्तम पर्याय ठरू शकतो. साधा – सोपा वरईचा पुलाव (Vari Pulao) करण्याची सोपी कृती पाहूयात (Fasting Recipe : How To Make Vari Pulao Recipe At Home).
साहित्य :-
१. साजूक तूप - १ टेबलस्पून
२. जिरे - १ टेबलस्पून (पर्यायी)
३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ हिरव्या मिरच्या
४. कडीपत्ता - ४ ते ५ पाने (पर्यायी)
५. बटाटा - १ कप (छोट्या फोडी केलेल्या)
६. शेंगदाणे - १ कप (पाण्यांत भिजवलेले)
७. वरीचे तांदूळ / भगर - २ कप (पाण्यांत भिजवून घेतलेली)
८. पाणी - गरजेनुसार
९. मीठ - चवीनुसार
कृती :-
१. एक मोठ्या भांड्यात साजूक तूप घेऊन ते संपूर्णपणे वितळवून घ्यावे. मग यात जिरे, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, भिजवलेले शेंगदाणे व बटाट्याच्या फोडी करुन घालाव्यात.
२. आता साजूक तुपात हे सगळे पदार्थ हलकेच खरपूस असे परतून घ्यावेत.
राखी पौर्णिमा स्पेशल : झटपट करा ब्रेडचा कलाकंद! विकतपेक्षा भारी मऊमऊ-रवाळ कलाकंद करा झटपट...
गार झाल्यावरही टम्म फुगलेल्याच राहतील पुऱ्या! पाहा ६ टिप्स- मस्त पुऱ्या डब्यात द्या, सावकाश खा..
३. वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून ते पाण्यांत २ ते ३ तास भिजत ठेवून द्यावेत.
४. सगळे जिन्नस तुपात परतून झाल्यानंतर त्यात पाण्यांत भिजवलेले वरीचे तांदूळ घालावेत. मग चमच्याने सगळे जिन्नस कालवून एकजीव करून घ्यावेत.
५. गरजेनुसार थोडे पाणी घालून त्यावर झाकण ठेवून वाफेवर वरीचे तांदूळ शिजवून घ्यावेत.
सगळ्यात शेवटी गरमागरम वरीच्या पुलाववर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून खाण्यासाठी सर्व्ह करावा. दही आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत हा वरीच्या तांदुळाचा पुलाव अधिकच चविष्ट लागतो.