चटणी म्हणजे आपल्या ताटाचा आत्माच जणू. वरण-भात असो किंवा पोळी-भाजी असो चटणीशिवाय सगळंच फिकं वाटतं. (tamarind chutney recipe) महाराषट्रातील अनेक भागात विविध पदार्थांपासून चटण्या बनवल्या जातात. प्रांत बदलला की त्याची चव देखील बदलते. (traditional tamarind chutney) त्यातीलच एक खास चव म्हणजे ओल्या चिंचेची चटणी. चवीला गोड, आंबट आणि थोडीशी तिखट असणारी ही चटणी. (homemade chutney recipes) महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये ती विविध पद्धतीने बनवली जाते. ही चटणी गूळ किंवा लसूण घालून केली जाते. तर कुणी मिरची घालून तिला झणझणीत चव देते. (authentic Indian chutney)
सध्या बाजारात चिंचेच्या चटण्या सहज मिळतात पण घरी केलेल्या चटणीची चव काही औरच. ही चटणी एकदा करुन ठेवल्याने काही दिवस टिकते.(tangy chutney for snacks) घरगुती चव असल्यामुळे केमिकल फ्री असते. ज्यामुळे पचनही हलके होते. या चटणीमुळे जेवणाचा स्वाद देखील अधिक वाढतो. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (easy chutney recipe at home)
साहित्य
ओली चिंच - १० ते १२
लसूण पाकळ्या - ७ ते ८
हिरव्या मिरच्या - ५ ते ६
शेंगदाणे - अर्धी वाटी
गूळ - अर्धी वाटी
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
जिरे - १ चमचा
आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
बोर मिरची - फोडणीसाठी
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला ओली चिंच घ्यावी लागतील. ही चिंच झाडावरची असायला हवी. त्यानंतर सुरीच्या मदतीने त्याचे लहान लहान तुकडे करा. नंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले चिंच, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, गूळ, कोथिंबीर आणि पाणी घालून वाटण तयार करा.
2. आता या मिश्रणाला एका बाऊलमध्ये घ्या. वरुन मीठ घाला. फोडणी पात्रात तेल गरम करुन त्यात जिरे, आलं-लसूण पेस्ट आणि बोरी मिरची घाला. तयार फोडणी वाटणावर घालून मिक्स करा. आनंदाने खा आंबट-गोड ओल्या चिंचेची चटणी.
