श्रावणात येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला आता अगदी काहीच दिवस बाकी आहेत. नागपंचमीच्या सणाला नागदेवतेची पूजा करुन वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या सणाला (Tilachya karanjya recipe) विशेष असे गोडाधोडाचे काही खास पदार्थ घरोघर तयार केले जातात, यातील एक हमखास (Nagpanchami special til karanji) प्रत्येकाच्या घरी केला जाणारा पदार्थ म्हणजे तिळाच्या खुसखुशीत करंज्या. नागपंचमीच्या सणाला नैवेद्याच्या ताटात तिळाच्या करंज्यांना विशेषसा असे मनाचे स्थान असते(How To Make Tilachya Karanjya For Nagpanchami).
बाहेरुन खुसखुशीत आवरण व आतून तीळ आणि गुळाचे गोड सारण... म्हणजे ऐकूनच मन अगदी या करंज्या खाण्यास आतुर होत. ही करंजी फक्त चविष्टच नसून शरीरासाठीही गुणकारी असते, कारण (Traditional Maharashtrian karanji recipe) तीळ आणि गूळ यांचे मिश्रण शरीराला उष्णता आणि ऊर्जा देते. तिळामध्ये असलेले पोषक घटक आणि त्यांचा अनोखा स्वाद करंजीला एक वेगळीच चव देतो. या खुसखुशीत आणि स्वादिष्ट करंज्या तुमच्या नागपंचमीच्या फराळाची लज्जत वाढवतील, यात शंका नाही. यंदाच्या नागपंचमीला पारंपरिक तिळाच्या करंज्या कशा तयार करायच्या व त्याची रेसिपी काय आहे ते पाहूयात.
साहित्य :-
१. बारीक रवा - १ कप
२. मैदा - १/२ कप
३. मीठ - चवीनुसार
४. दूध - १ कप
५. साजूक तूप - १ टेबलस्पून
६. पांढरे तीळ - १ कप
७. सुक्या खोबऱ्याचा किस - ३ ते ४ टेबलस्पून
८. चारोळी - १ टेबलस्पून
९. लवंग - ३ ते ४ काड्या
१०. काजूचे तुकडे - २ टेबलस्पून
११. गूळ - १ कप (बारीक चिरलेला)
१२. वेलची पूड - १/२ टेबलस्पून
१३. जायफळ पूड - १/२ टेबलस्पून
१४. तेल - तळण्यासाठी
श्रावणातील पदार्थ खास करा डाळिंबी भात! जेवणाची वाढेल लज्जत - खा पोटभर निवांत...
श्रावण स्पेशल : साबुदाण्याची रसमलाई! उपवासाला करा गोडाधोडाचा नवीन पदार्थ, करायलाही सोपा...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक रवा, मैदा, चवीनुसार मीठ, दूध, साजूक तूप घालून पीठ कोरड मिक्स करून घ्या. त्यानंतर गरजेनुसार थोडं थोडं दूध घालून पीठ मऊसूत मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यानंतर ते अर्धा तास झाकून ठेवावे.
२. एका पॅनमध्ये पांढरे तीळ घेऊन ते मंद आचेवर हलकेच भाजून घ्यावेत. तीळ भाजल्यानंतर त्यात सुक्या खोबऱ्याचा किस, लवंग काड्या,चारोळ्या, काजूचे तुकडे घालावेत. सगळे मिश्रण एकत्रित करुन मंद आचेवर व्यवस्थित कोरडे भाजून घ्यावे.
३. करंजीचे सारण भाजून घेतल्यानंतर ते थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यावे. मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यात बारीक किसलेला गूळ, वेलची पूड, जायफळ किसून घालावे. मिक्सर फिरवून सारण तयार करुन घ्यावे.
४. झाकून ठेवलेले करंजीच्या पारीचे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे. त्यानंतर या तयार पिठाचे छोटे गोलाकार गोळे करुन घ्यावेत. हे गोळे लाटून त्याची पारी तयार करुन घ्यावी. तयार पारीमध्ये सारण भरुन त्याला करंजीचा आकार द्यावा. आपण करंजीच्या रेडिमेड साच्याचा देखील वापर करु शकता.
५. कढईत तेल ओतून ते व्यवस्थित गरम करुन घ्यावे. गरम तेलात करंजी सोडून मंद आचेवर करंजी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावी.
नागपंचमीसाठी स्पेशल तिळाच्या करंज्या खाण्यासाठी तयार आहेत.