उन्हाळ्यात घरोघरी हमखास वाळवणाचे पदार्थ तयार केले जातात. हे वाळवणाचे पदार्थ लोणच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. उन्हाळ्यात विकत मिळणाऱ्या हिरव्यागार कच्च्या कैरीच लोणचं (Instant Raw Mango Pickle In 10 Minutes) तयार केलं जात. कच्च्या कैरीच चटपटीत - मसालेदार लोणचं ( Instant home made mango pickle recipe) एकदाच तयार करून वर्षभर खाल्लं जात. परंतु हे लोणचं तयार करण्याची प्रक्रिया फारच मोठी आणि किचकट असते. पूर्वीच्या जुन्या पारंपरिक पद्धतीने लोणचं तयार करायचं म्हटलं तर त्यात किमान २ ते ४ दिवस लागतातच(How to Make the Most Delicious Mango Pickle in 5 Minutes in pressure cooker).
सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमुळे लोणचं करायला इतका पुरेसा वेळ नसतो, अशावेळी लोणचं अगदी झटपट तयार करता यावं असं वाटत. यासाठीच, प्रेशर कुकरमध्ये कच्च्या कैरीच इन्स्टंट लोणचं तयार करण्याची झटपट आणि सोपी पद्धत आपण वापरु शकतो. वेळेअभावी पारंपरिक पद्धतीने लोणचं तयार करणे शक्य नसताना आपण ही पद्धत वापरु शकतो. प्रेशर कुकरमध्ये, योग्य प्रमाणात मसाले, उकळवून घेतलेलं तेल आणि कच्च्या कैरीचे ताजे तुकडे यांच्या मिश्रणातून तयार होणारं हे झणझणीत लोणचं प्रत्येकाच्या चवीलाच नव्हे तर मनालाही भावणारं ठरतं. यासाठी, झटपट प्रेशर कुकरमध्ये कच्च्या कैरीच लोणचं कसं करायचं याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. कच्ची कैरी - १ किलो
२. मीठ - चवीनुसार
३. हळद - १ टेबलस्पून
४. तेल - १५० ग्रॅम
५. धणे - २ टेबलस्पून
६. जिरे - २ टेबलस्पून
७. बडीशेप - २ टेबलस्पून
८. मेथी दाणे - १ टेबलस्पून
९. मोहरी - १ टेबलस्पून
१०. काळीमिरी - १ टेबलस्पून
११. कलोंजी - १ टेबलस्पून
१२. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
१३. हिंग - १ टेबलस्पून
१४. ओवा - १ टेबलस्पून
आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...
कृती :-
१. सगळ्यात आधी कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
२. आता या कैरीचे तुकडे एका बाऊलमध्ये घेऊन त्यात चवीनुसार मीठ व हळद घालून घ्यावे. कैरीच्या तुकड्यांना हळद मीठ लावून घ्यावे.
३. एका पॅनमध्ये धणे, जिरे, बडीशेप, मेथी दाणे, ओवा, मोहरी, काळीमिरी असे सगळे जिन्नस कोरडे भाजून घ्यावेत.
४. भाजून घेतलेले हे सगळे जिन्नस थोडे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये सगळे मिश्रण घालूंन वाटून त्याची पावडर तयार करून घ्यावी. मिक्सरमध्ये वाटून तयार केलेला मसाला एका डिशमध्ये काढून घ्यावा. या मसाल्यात कलोंजी मिक्स करावी.
५. आता प्रेशर कुकरमध्ये तेल घेऊन त्यात सर्वातआधी काश्मिरी लाल मिरची आणि चिमूटभर हिंग घालावं. आता यात कच्च्या कैरीच्या फोडी घालाव्यात. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला यात घालावा. सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करावे.
६. आता शिट्टी बाजूला काढून ठेवून कुकरचे झाकण लावून ५ ते १० मिनिटे लोणचं व्यवस्थित वाफेवर शिजू द्याव.
७. त्यानंतर प्रेशर कुकरमधून लोणचं काढून एका डिशमध्ये ठेवून थंड करून घ्यावे. लोणचं थंड झाल्यावर हवाबंद बरणीत भरून स्टोअर करावं.
अशाप्रकारे प्रेशर कुकरमध्ये अगदी झटपट तुम्ही कच्च्या कैरीचं चटपटीत आणि वर्षभर टिकणार लोणचं तयार करु शकता.