मुलांना शाळेच्या डब्यात काय द्यावं किंवा सकाळी नाश्त्याला काय करावं, हा प्रश्न घरोघरीच्या महिलांना खूप छळतो. हा पदार्थ हेल्दी असावा शिवाय करायला सोपा असावा असं वाटत असतं. शिवाय सकाळचा नाश्ता चवदार, आवडीचा आणि पोटभरीचा झाला की मग सगळा दिवसच कसा मस्त जातो. तसंच काहीसं मुलांचंही असतं. शाळेच्या मधल्या सुटीत त्यांना डबा उघडल्यानंतर काही चमचमीत, चवदार दिसलं की ते ही आवडीने डबा खातात आणि त्यांचेही शाळेचे पुढचे तास आनंदात जातात. म्हणूनच एखाद्या दिवशी मुलांना शाळेत राजमा टॅकोज देऊन पाहा. एरवी बऱ्याच मुलांना राजमा आवडत नसल्याने ते खाणं टाळतात (How To Make Tacos at Home?). पण या पदार्थामधून मात्र ते आवडीने खातील (rajma tacos recipe). प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असलेले राजमा टॅकोज कसे करायचे ते पाहूया..(simple and easy recipe of making healthy tacos)
राजमा टॅकोज करण्याची रेसिपी
राजमा टॅकोज कसे करायचे याची रेसिपी saritaskitchenofficial या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
पाऊण कप उकडलेला राजमा
१ बटाटा
१ वाटी कणिक
उकडलेले बटाटे सोलताना हात पोळतात? १ भन्नाट आयडिया- काही सेकंदातच सोला किलोभर बटाटे..
१ टेबलस्पून रवा
कांदा, सिमला मिरची प्रत्येकी एकेक
१ चमचा आलं, लसूण, मिरची पेस्ट
१ चमचा टोमॅटो केचअप आणि शेजवान सॉस
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
गरजेनुसार साजूक तूप
कृती
राजमा रात्रीच स्वच्छ धुवून पाणी घालून भिजवून ठेवा. यानंतर भिजलेले राजमा, बटाटा थोडंसं मीठ घालून एकत्रितपणेच कुकरमध्ये उकडायला लावा.
लोखंडी तव्यावर पोळ्या भाजताना जळतात? 'या' पद्धतीने तवा स्वच्छ करा- पोळ्या जळणार नाहीत..
तोपर्यंत एका भांड्यामध्ये कणिक आणि रवा घ्या आणि थोडंसं मीठ घालून ते नेहमीपेक्षा थोडं घट्ट भिजवून घ्या. तुम्ही कणकेमध्ये ओरिगॅनो, कसूरी मेथी, चिली फ्लेक्स असे पदार्थही घालू शकता. कणिक मळून झाल्यानंतर ती १० मिनिटे झाकून ठेवा.
तोपर्यंत कांदा, सिमला मिरची बारीक चिरून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढईमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात आलं- लसूण पेस्ट, चिरलेल्या भाज्या, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, मीठ आणि तिखट घाला. बटाटा आणि राजमा मॅश करून घाला.
आता पुऱ्यांपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या पोळ्या लाटा. ही पोळी एका बाजुने पक्की तर दुसऱ्या बाजुने अर्धवट भाजावी. आता जो भाग पक्का भाजला आहे त्याच्या बेसला थोडा टोमॅटो सॉस लावावा आणि तयार केलेलं मिश्रण लावावं. यानंतर पोळी दुमडून घ्यावी आणि तूप टाकून तव्यावर खमंग भाजून घ्यावी. कुरकुरीत, खमंग, पौष्टिक टॅकोज तयार.