Lokmat Sakhi >Food > हिरव्यागार कोवळ्या कॉर्नचे करा चटपटीत मसालेदार कॉर्न चाट, थंडीत खवळणाऱ्या भुकेसाठी मस्त पर्याय...

हिरव्यागार कोवळ्या कॉर्नचे करा चटपटीत मसालेदार कॉर्न चाट, थंडीत खवळणाऱ्या भुकेसाठी मस्त पर्याय...

Corn Chaat Recipe : Lip Smacking Sweet Corn Chaat Recipes : How to Make Street Style Corn Chaat At Home : पिवळ्या धम्मक टपोऱ्या मक्याच्या दाण्यांचे करा हेल्दी कॉर्न चाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 17:42 IST2024-12-13T17:40:51+5:302024-12-13T17:42:12+5:30

Corn Chaat Recipe : Lip Smacking Sweet Corn Chaat Recipes : How to Make Street Style Corn Chaat At Home : पिवळ्या धम्मक टपोऱ्या मक्याच्या दाण्यांचे करा हेल्दी कॉर्न चाट...

How to Make Street Style Corn Chaat At Home Corn Chaat Recipe Lip Smacking Sweet Corn Chaat Recipes | हिरव्यागार कोवळ्या कॉर्नचे करा चटपटीत मसालेदार कॉर्न चाट, थंडीत खवळणाऱ्या भुकेसाठी मस्त पर्याय...

हिरव्यागार कोवळ्या कॉर्नचे करा चटपटीत मसालेदार कॉर्न चाट, थंडीत खवळणाऱ्या भुकेसाठी मस्त पर्याय...

थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्याने आपल्याला सतत भूक लागते. भूक लागल्यावर या हिवाळ्यात आपल्याला काहीतरी चटपटीत, मसालेदार खावंसं वाटत. आजकाल बाजारांत वर्षाचे बाराही महिने मक्याचे कणीस अगदी सहज विकत मिळते. इतर ऋतुंपेक्षा हिवाळ्यात मिळणारे हे मक्याचे कणीस (Corn Chaat Recipe) अगदी फ्रेश आणि ताजे असते. या पिवळ्या धम्मक टपोऱ्या मक्याच्या दाण्यांचे (Lip Smacking Sweet Corn Chaat Recipes) आपण अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करु शकतो(How to Make Street Style Corn Chaat At Home).

मक्याचे दाणे ताजे आणि फ्रेश असल्याने त्यापासून तयार केले जाणारे पदार्थही तितकेच टेस्टी आणि चवीला उत्तम होतात. याचबरोबर हिवाळ्यात मक्याचे दाणे खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील अधिक फायदेशीर असते. मक्यात भरपूर प्रमाणात इ जीवनसत्त्व असतं. यातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण खूपच कमी असतं. तसेच मक्यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्यानं मका खाणं हे आरोग्यदायी मानलं जातं. यासाठीच हिवाळ्यात दोन जेवणाच्यामध्ये लागणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी आपण झटपट तयार होणारे हेल्दी कॉर्न चाट खाऊ शकतो. मक्याच्या दाण्यांचे पौष्टिक कॉर्न चाट कसे तयार करायचे ते पाहुयात.

साहित्य :- 

१. मक्याचे दाणे - २ कप (उकडवून घेतलेले) 
२. कॉर्न फ्लॉवर - ४ टेबलस्पून 
३. मीठ - चवीनुसार 
४. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून 
५. कांदा - ३ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
६. हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरलेल्या)
७. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
८. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
९. पाणी - ३ कप 
१०. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
११. चाट मसाला - १/२ टेबसलस्पून  

फक्त कपभर मटारचे करा चविष्ट धिरडे, हिवाळ्यातला झटपट पौष्टिक हिरवागार कुरकुरीत नाश्ता-सोपी रेसिपी...


जान्हवी कपूर हिवाळ्यात आवडीने खाते रताळ्याचा ' हा ' खास पदार्थ, वजन होते कमी - पचनही सुधारते...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चवीनुसार मीठ व मक्याचे दाणे घालून ते व्यवस्थित उकळवून घ्यावेत. 
२. आता हे उकळवून घेतलेले मक्याचे दाणे एका बाऊलमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पूड, कॉर्न फ्लॉवर घालून चमच्याने कालवून घ्यावे. 
३. एका कढईत तेल घेऊन त्यात हे मक्याचे दाणे घालून हलकेच तळून घ्यावेत. 

४. मक्याचे दाणे तळून घेतल्यानंतर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यावेत. 
५. आता या बाऊलमधील मक्याच्या दाण्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबाचा रस, चाट मसाला घालावा आता चमच्याच्या मदतीने सगळे जिन्नस एकजीव करून एकत्रित करुन घ्यावे. 

आपले चटपटीत क्रिस्पी कॉर्न चाट खाण्यासाठी तयार आहे. आपल्या आवडीनुसार आपण त्यावर शेव देखील भुरभुरवून घालू शकता.


Web Title: How to Make Street Style Corn Chaat At Home Corn Chaat Recipe Lip Smacking Sweet Corn Chaat Recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.