Lokmat Sakhi >Food > रोज चपाती खाऊन कंटाळा आला? करा आगळी-वेगळी सोयाबीन चपाती, शरीराला मिळेल भरपूर प्रोटीन

रोज चपाती खाऊन कंटाळा आला? करा आगळी-वेगळी सोयाबीन चपाती, शरीराला मिळेल भरपूर प्रोटीन

healthy roti for weight loss:soya flour roti benefits : vegetarian high protein recipes: फिटनेस किंवा वजन कमी करणाऱ्यांसाठी जास्त प्रोटीन हवं असल्यास परफेक्ट पर्याय आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 18:05 IST2025-06-25T18:00:00+5:302025-06-25T18:05:01+5:30

healthy roti for weight loss:soya flour roti benefits : vegetarian high protein recipes: फिटनेस किंवा वजन कमी करणाऱ्यांसाठी जास्त प्रोटीन हवं असल्यास परफेक्ट पर्याय आहे.

how to make soybean chapati recipe high protein Indian chapati protein-rich flatbread for lunch | रोज चपाती खाऊन कंटाळा आला? करा आगळी-वेगळी सोयाबीन चपाती, शरीराला मिळेल भरपूर प्रोटीन

रोज चपाती खाऊन कंटाळा आला? करा आगळी-वेगळी सोयाबीन चपाती, शरीराला मिळेल भरपूर प्रोटीन

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शरीराला आवश्यक पोषण मिळणे फार गरजेचे आहे.(Soya chapati recipe)त्यात शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी आपण अनेक पावडर वैगरे खात असतो.(Weight loss food) सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असते आणि त्यात असलेल्या फायबर्स, लोह आणि कॅल्शियम आरोग्यासाठी चांगले असते.(Healthy Recipe) सोयाबीनमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि खनिजांचे चांगले स्त्रोत आहे. सोयाबीनमुळे हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगांसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत होते.(how to make soybean chapati) 
सोयाबीनपासून केलेली चपाती ही आरोग्यासाठी चांगली असते. फिटनेस किंवा वजन कमी करणाऱ्यांसाठी जास्त प्रोटीन हवं असल्यास परफेक्ट पर्याय आहे. ही चपाती आपण मुलांना देखील खाऊ घालू शकतो. पाहूया कशी करायची याची रेसिपी.(soya flour roti benefits)

नाश्त्याला करा 'हिरव्या मिरचीचा पराठा', खमंग-खुसखुशीत पदार्थ- शाळेच्या डब्यासाठीही खास खाऊ


साहित्य 

सोया चंक - २०० ग्रॅम
बेसन- १२० ग्रॅम
गव्हाचे पीठ - १२० ग्रॅम
पाणी 
मीठ 
हळद - १ चमचा 
लाल तिखट - १ चमचा 


 

कृती 

1. सगळ्यात आधी गॅसवर पाणी तापवून त्यात सोयाबीन घाला. ५ मिनिटे उकळवून घ्या. चाळणी ठेवून त्यातील पाणी गाळून घ्या. पाणी निघेपर्यंत बाजूला ठेवा. 

2. आता मिक्सरच्या भांड्यात सोयाबीन, मीठ, हळद, लाल तिखट आणि पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका ताटात घेऊन त्यात बेसनाचे पीठ आणि गव्हाचे पीठ घाला. 

3. या पीठाला व्यवस्थित मळून घ्या. त्याचे गोळे करुन वरुन खालून गव्हाचे पीठ लावून लाटून घ्या. तव्यावर दोन्ही बाजून चपाती भाजून घ्या. 

4. सोयाबीनच्या चपातीतून साधरणत: ८ ग्रॅम प्रोटीन मिळेल आणि चवीला देखील ही चपाती चांगली लागते. 
 

 

Web Title: how to make soybean chapati recipe high protein Indian chapati protein-rich flatbread for lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.