इडलीसोबत सांबार केलं आणि डोशासोबत भाजी केली तरी चवीला थोडी नारळाची चटणी हवीच असते. आता साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये किंवा उडपी रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा तिथे हमखास नारळाची चटणी वाढली जाते. ही चटणी आपण घरी ट्राय करून पाहातो. ती चवदारही होते. पण तिला जो साऊथ इंडियन चवीचा टच हवा असतो, तो काही येत नाही. म्हणूनच आता ही एक अस्सल साऊथ इंडियन स्टाईलची नारळाची चटणी कशी करायची पाहा (how to make south indian style udupi chutney?).. रेसिपी अगदी सोपी असून ती खूप झटपट होते.(Udupi Style Coconut Chutney or Neer Chutney Recipe)
साऊथ इंडियन स्टाईलची नारळाची चटणी कशी करायची?
इडली, डोसासोबत खाण्यासाठीची नारळाची चटणी करण्यासाठी आपण खोबरं वापरतो. ते वापरणं टाळा आणि त्याऐवजी नारळ घाला. त्यासाठी सगळ्यात आधी तर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घाला. त्यानंतर २ ते ३ मिरच्या, कडिपत्त्याची ८ ते १० पानं आणि १ चमचा डाळवं, १ चमचा शेंगदाणे घालून परतून घ्या.
चेहरा गोरा, पण मान खूपच काळवंडली? ३ पदार्थ मानेवर चोळा, १० मिनिटांत मान स्वच्छ
यानंतर भाजून घेतलेले सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यातच अर्धी वाटी किसलेलं नारळ, चिंचेचे २ ते ३ तुकडे, १ इंच आल्याचा तुकडा असं सगळं घाला आणि मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या.
यानंतर ३ ते ४ टेबलस्पून कोथिंबीर घेऊन ती देखील मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक वाटून घ्या. आता वाटून घेतलेली चटणी एका भांड्यात काढा.
Gardening: हिवाळ्यात थंड पाण्याचा रोपांनाही त्रास होतो का? रोपांना कधी, कोणतं पाणी घालायचं?
आता चटणीला खमंग फ्लेवर आणण्यासाठी तिला वरतून फोडणी घालणं गरजेचं आहे. यासाठी गॅसवर छोटी कढई गरम करायला ठेवा. तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता आणि वाळलेल्या लाल मिरच्या घालून फोडणी करून घ्या. यानंतर चवीनुसार मीठ घातलं की सगळं एकदा हलवून घ्या. मस्त उडपी स्टाईल नारळाची चटणी तयार.
