Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अस्सल कोकणी सोलकढीची सोपी रेसिपी- उन्हाळ्यातली खरी मजा, शरीराला मिळेल थंडावा

अस्सल कोकणी सोलकढीची सोपी रेसिपी- उन्हाळ्यातली खरी मजा, शरीराला मिळेल थंडावा

Solkadhi Recipe: सोलकढी करण्याची ही एक सोपी रेसिपी पाहा आणि या उन्हाळ्यात ती नक्कीच ट्राय करा..(easy and simple recipe of making solkadhi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 16:26 IST2026-03-21T16:25:41+5:302026-03-21T16:26:23+5:30

Solkadhi Recipe: सोलकढी करण्याची ही एक सोपी रेसिपी पाहा आणि या उन्हाळ्यात ती नक्कीच ट्राय करा..(easy and simple recipe of making solkadhi)

how to make solkadhi, solkadhi recipe, easy and simple recipe of making solkadhi | अस्सल कोकणी सोलकढीची सोपी रेसिपी- उन्हाळ्यातली खरी मजा, शरीराला मिळेल थंडावा

अस्सल कोकणी सोलकढीची सोपी रेसिपी- उन्हाळ्यातली खरी मजा, शरीराला मिळेल थंडावा

उन्हाळ्याचे दिवस आले की नुसतं पाणी पाणी होतं. जेवण कमी जातं आणि त्याऐवजी थंडगार पेय पिण्यावरच जास्त भर द्यावासा वाटतो. त्यामुळेच तर या दिवसांत ताक, पन्हं, लिंबू सरबत असे वेगवेगळे पदार्थ प्यायले जातात. या पदार्थांमध्ये येणारं आणखी एक पारंपरिक पेय म्हणजे सोलकढी. अमसूल, नारळाचं दूध हे दोन मुख्य घटक असणारी सोलकढी म्हणजे उन्हाळ्यातला गारवा (how to make solkadhi?).. अशी मस्त सोलकढी जर तुम्हाला करायची असेल तर पुढे सांगितलेली एक सोपी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा..(easy and simple recipe of making solkadhi)

सोलकढी करण्याची रेसिपी

 

साहित्य 

१ वाटी नारळाचे काप

८ ते १० आमसूल

गाड्यावर मिळते तशी चटपटीत भेळ घरी जमतच नाही? बघा खास ट्रिक, भेळ होईल एकदम चवदार

३ ते ४ हिरव्या मिरच्या आणि ३ ते ४ लसूण पाकळ्या

जिरे, काळे मीठ, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

 

सगळ्यात आधी तर आमसूल धुवून घ्या आणि नंतर ते गरम पाण्यात भिजत घाला.

यानंतर नारळाचे बारीक काप करा. ते मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण पाकळ्याही घाला. सगळे पदार्थ थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या.

कमी वयात मुलींना पाळी येऊ नये म्हणून ५ व्यायाम, रोज करायला लावा- वजनही वाढणार नाही

यानंतर एका सुती कपड्यातून हे सगळं गाळून घ्या आणि नारळाचं दूध काढा. आता नारळाचं दूध आमसुलाच्या पाण्यात घाला. त्यात काळंमीठ, साधं मीठ, अगदी चिमूटभर साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. थोडासा बर्फ घातला की गारेगार सोलकढी तयार. 
 


 

Web Title : असली कोंकणी सोलकढ़ी रेसिपी: आसान, गर्मियों में शरीर को ठंडक देने वाला पेय।

Web Summary : इस आसान सोलकढ़ी रेसिपी के साथ गर्मी को मात दें! कोकम और नारियल के दूध से बना यह पारंपरिक कोंकणी पेय ताज़ा और ठंडक प्रदान करता है। सरल चरणों के साथ घर पर इस स्वादिष्ट और स्वस्थ पेय को बनाना सीखें।

Web Title : Authentic Kokani Solkadhi Recipe: Easy, cooling summer drink for your body.

Web Summary : Beat the summer heat with this easy Solkadhi recipe! This traditional Kokani drink, made with kokum and coconut milk, offers a refreshing and cooling experience. Learn how to prepare this delicious and healthy beverage at home with simple steps.