Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाश्त्याला १० मिनिटांत करा मऊ जाळीदार पांढरा ढोकळा; सोपी रेसिपी, झटपट होईल ढोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:40 IST

How To Make Soft Spongy White Dhokla : डाळ-तांदूळ किमान ६ ते ७ तास भिजत घातल्यानंतर ते वाटताना थोडे दही किंवा आंबट ताक वापरावे.

पांढरा ढोकळा हा नाश्त्याचा पदार्थ आरोग्यासाठी हलका आणि चवीला अप्रतिम असा पदार्थ आहे. मात्र, अनेकदा तो घरी बनवताना कडक होतो किंवा पुरेसा फुलत नाही. परफेक्ट पांढरा ढोकळा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे योग्य प्रमाण. (How To Make Soft Spongy White Dhokla)

साधारणपणे ३:१ असे प्रमाण म्हणजेच ३ वाटी तांदूळ आणि १ वाटी उडदाची डाळ वापरल्यास ढोकळा छान मऊ होतो. तांदूळ वापरताना शक्यतो जुना तांदूळ किंवा कणी वापरावी, कारण यामुळे पिठाला चांगला चिकटपणा येतो आणि ढोकळा चिवट होत नाही. (Soft Spongy White Dhokla Recipe)

डाळ-तांदूळ किमान ६ ते ७ तास भिजत घातल्यानंतर ते वाटताना थोडे दही किंवा आंबट ताक वापरावे. यामुळे नैसर्गिकरीत्या आंबण्याची प्रक्रिया जलद होते. पीठ वाटताना ते अगदी मऊ लोण्यासारखे न करता थोडे रवादार ठेवावे, ज्यामुळे ढोकळ्याला छान टेक्सचर मिळते.

वाटलेले पीठ उबदार जागी ८-१० तास आंबण्यासाठी ठेवावे. थंडीच्या दिवसात पीठ लवकर फुगत नाही, अशा वेळी भांड्याला गरम कपड्याने गुंडाळून ठेवणे फायदेशीर ठरते. पीठ जितके चांगले आंबेल, तितका ढोकळा जाळीदार आणि हलका होईल.

ढोकळ्याचा रंग पांढराशुभ्र राहण्यासाठी त्यात हळद घालणे टाळावे. वाफवताना नेहमी मोठ्या आचेचा वापर करावा. पाणी पूर्ण उकळल्यानंतरच पिठाचे ताट स्टीमरमध्ये ठेवावे. जर तुम्ही ईनो किंवा खाण्याचा सोडा वापरणार असाल, तर तो अगदी शेवटच्या क्षणी घालून पीठ एकाच दिशेने फेटावे.

वाफवून झाल्यावर ढोकळा लगेच न कापता ५ मिनिटे बाहेर गार होऊ द्यावा, जेणेकरून त्याच्या वड्या सुबक पडतात. वरून थोडी मिरी पूड आणि तेलाची फोडणी दिल्यास हा ढोकळा दिसायलाही हॉटेलसारखा आकर्षक लागतो. या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स पाळल्यास तुमचा पांढरा ढोकळा नेहमीच कापसासारखा मऊ आणि चविष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Make soft, spongy white dhokla in 10 minutes: Easy recipe

Web Summary : For soft white dhokla, use a 3:1 rice to dal ratio. Soak, grind with sour yogurt, and let the batter ferment. Steam on high heat, avoid turmeric, and cool slightly before cutting. This yields soft, delicious dhokla.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.