दिवाळीच्या (Diwali 2025) दिवसांत पनीरचे बरेच पदार्थ घरांत केले जातात. बरेचजण पनीरची भाजी, पराठा असे पदार्थ पाहूणे मंडळींसाठी करतात. पण या दिवसांमध्ये पनीरला बरीच मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी अनेकदा विक्रेते पनीर तयार करण्याच्या प्रक्रियेत भेसळ करतात आणि बनावट पनीर ग्राहकांना विकतात. अशा बनावट, भेसळयुक्त पनीरमुळे तब्येतीचे बरेच विकार उद्भवू शकतात. (How To Make Soft Paneer At Home)
पनीर घरच्याघरी तयार करणं एकदम सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. घरच्याघरी सोप्या पद्धतीनं पनीर कसं करायची याची रेसिपी पाहूया ज्यामुळे कमीत कमी साहित्या तुम्हाला विकतसारखं परफेक्ट पनीर बनवता येईल. (How To Make Soft, Fresh Paneer At Home)
घरी पनीर करण्याची सोपी रेसिपी
एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घेऊन मध्यम आचेवर गरम करा. दूध खाली लागणार नाही यासाठी मध्ये मध्ये ढवळत राहा. दुधाला चांगली उकळी आली की, लगेच गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर लगेच लिंबाचा रस किंवा व्हिनेगर दुधात हळूहळू घाला आणि चमच्याने हलक्या हाताने ढवळा.
एकाच वेळी संपूर्ण रस घालू नका. दूध फाटायला सुरुवात झाली की रस घालणे थांबवा. दूध फाटल्यावर पाणी हिरवट दिसेल आणि पनीरचा गोळा वेगळा होईल. दूध फाटल्यानंतर २ ते ३ मिनिटे तसेच राहू द्या. जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर पनीर कडक होईल.
चेहरा काळपट दिसतोय? शहनाज हुसैन सांगतात ५ घरगुती फेसपॅक लावा, चमकेल चेहरा
एका मोठ्या भांड्यावर चाळणी ठेवा आणि त्यावर स्वच्छ सुती कापड पसरवा. फाटलेले दूध या कापडात ओतून गाळून घ्या. पनीरचा गोळा कापडात असतानाच, त्यावर लगेच थंड पाणी ओता. यामुळे लिंबाचा आंबटपणा निघून जाईल आणि पनीरची पुढची कुकिंग प्रक्रिया थांबेल, ज्यामुळे ते मऊ राहील. कापडाची पोटली बनवा आणि हाताने हलके दाबून त्यातील जास्तीचे पाणी काढून टाका.
दिवाळीसाठी खरेदी करा खास कलांजली पैठणी; १० सुंदर रंग- ब्लाऊजवर आरी वर्क उठून दिसेल
ही पोटली एका सपाट प्लेटवर ठेवा. पोटलीवर दुसरी सपाट प्लेट ठेवा आणि त्यावर एखादे जड वजन ठेवा.पनीर घट्ट होण्यासाठी १ ते २ तास असेच दाबून ठेवा.१ ते २ तासांनी पनीर सेट झाल्यावर, कापडातून बाहेर काढा आणि त्याचे चौकोनी तुकडे करा.
