Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पोळ्यांचे काठ कडक होतात? कणिक भिजवताना 'हा' पदार्थ घाला- शिळ्या झाल्या तरीही पोळ्या राहतील नरम

पोळ्यांचे काठ कडक होतात? कणिक भिजवताना 'हा' पदार्थ घाला- शिळ्या झाल्या तरीही पोळ्या राहतील नरम

Cooking Tips For Soft Roti or Chapati: पोळ्या वातड होत असतील आणि काठांना कडक होत असतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to make soft chapati?) 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2026 15:30 IST2026-01-17T15:29:41+5:302026-01-17T15:30:19+5:30

Cooking Tips For Soft Roti or Chapati: पोळ्या वातड होत असतील आणि काठांना कडक होत असतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to make soft chapati?) 

how to make soft chapati, simple tips for making soft chapati or roti, cooking tips for soft roti or chapati | पोळ्यांचे काठ कडक होतात? कणिक भिजवताना 'हा' पदार्थ घाला- शिळ्या झाल्या तरीही पोळ्या राहतील नरम

पोळ्यांचे काठ कडक होतात? कणिक भिजवताना 'हा' पदार्थ घाला- शिळ्या झाल्या तरीही पोळ्या राहतील नरम

Highlightsपुढे सांगितलेल्या काही टिप्स पाहा आणि त्यानुसार पोळ्या करण्याचा प्रयत्न करा...

छान ३ ते ४ पदर सुटलेल्या मऊ, लुसलुशीत पोळ्या जमणं हे खरंच मोठ्या कौशल्याचं काम असतं. कारण पोळ्या छान जमल्या की सगळा स्वयंपाकच करता येतो असं समजलं जातं. काही जणींना वर्षांनुवर्षे पोळ्या करण्याची सवय असते. त्यामुळे खूप काही विशेष प्रयत्न न करताही त्यांच्या हातच्या पोळ्या छानच होतात. पण ज्या नव्याने स्वयंपाक घरात यायला लागलेल्या असतात किंवा ज्यांना पोळ्या करण्याची सवयच नसते, त्यांच्या हातच्या पोळ्या कडक, वातड होतात. काठांना कडक होतात. बऱ्याचदा तर थोड्या कच्च्याही राहतात. अशावेळी नेमकं काय करावं हे सूचत नाही (simple tips for making soft chapati or roti). म्हणूनच पुढे सांगितलेल्या काही टिप्स पाहा आणि त्यानुसार पोळ्या करण्याचा प्रयत्न करा (cooking tips for soft roti or chapati). तुम्ही केलेल्या पोळ्या अगदी शिळ्या झाल्या तरी मऊच राहतील.(how to make soft chapati?)

 

पोळ्या मऊ होण्यासाठी उपाय

१. पोळ्या किंवा चपात्या मऊ होण्यासाठी काय करायला हवं यासाठी कुकींग एक्सपर्टनी त्यांचे काही अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये काहींचा असा अनुभव आहे की कणिक भिजवताना जर त्यात थोडं दही घातलं तर पोळ्या अतिशय मऊ होतात.

केस भराभर वाढण्यासाठी रामबाण उपाय- रोज १ चमचा 'ही' पावडर खा, गुडघ्यापर्यंत लांब होतील केस

२. तुम्ही हा दुसरा उपायही करून पाहू शकता. यामध्ये दह्याच्या ऐवजी दुधाचा वापर करा. म्हणजेच दूध थोडं काेमट करा आणि पाणी आणि दूध सम प्रमाणात एकत्र करून त्याने कणिक भिजवा. दुधात भिजवलेल्या कणिकेच्या पोळ्याही खूप मऊ होतात. 

 

३. तिसरा उपाय म्हणजे दही आणि बेकिंग सोडा हे मिश्रण. यासाठी कणिक भांड्यामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं दही आणि चिमूटभर बेकिंग सोडा घाला. यानंतर कोमट पाणी घालून कणिक भिजवून घ्या. या पद्धतीने केलेल्या पोळ्याही अतिशय मऊ, लुसलुशीत होतात.

सिंक, वॉशरूम किंवा इतर काही.. घरातून येणारी कोणताही दुर्गंधी चटकन होईल गायब- घ्या सोपे उपाय

चवीलाही छान लागतात. ज्यांच्या पोळ्या वातड होतात त्यांनी पोळ्या अगदी पातळ लाटू नयेत. थोड्या जाडसर लाटाव्या. कणिक भिजवल्यानंतर १० मिनिटे झाकून ठेवावी आणि त्यानंतर पोळ्या कराव्या. शिवाय पोळ्या झाल्यानंतर त्या थोड्या थंड झाल्या की लगेच झाकून ठेवाव्या. या काही टिप्स फॉलो केल्या तर पोळ्या नक्कीच मऊ होतील. 

 

Web Title : नरम रोटी के रहस्य: रोटी को मुलायम बनाने के लिए यह सामग्री मिलाएं।

Web Summary : कड़ी रोटियों से परेशान हैं? आटा गूंथते समय दही, गुनगुना दूध या दही के साथ बेकिंग सोडा मिलाएं। ये आसान उपाय सुनिश्चित करते हैं कि आपकी चपातियाँ ठंडी होने पर भी नरम रहें। अच्छी तरह गूंधें, आटे को आराम दें और सर्वोत्तम परिणामों के लिए ठीक से स्टोर करें।

Web Title : Soft Roti Secrets: Add This Ingredient for Tender, Lasting Results.

Web Summary : Tired of hard rotis? Add yogurt, lukewarm milk, or baking soda with yogurt while kneading the dough. These simple tips ensure your chapatis stay soft even when cold. Knead well, rest the dough, and store properly for best results.