Lokmat Sakhi >Food > सिंधी कढी रेसिपी: करिना कपूर- सोनाक्षी सिन्हासह बॉलीवूड सेलिब्रिटींचा आवडता पदार्थ, गरमागरम आणि चमचमीत

सिंधी कढी रेसिपी: करिना कपूर- सोनाक्षी सिन्हासह बॉलीवूड सेलिब्रिटींचा आवडता पदार्थ, गरमागरम आणि चमचमीत

How To Make Sindhi Kadhi: बहुतांश बॉलीवूड सेलिब्रिटींना सिंधी कढी हा पदार्थ खूप आवडतो. बघा तो नेमका कसा करायचा.. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ती कढी जरी असली तरी त्यात दही, ताक असं काहीच नसतं..(bollywood celebrities favourite sindhi kadhi recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 16:35 IST2025-02-19T12:55:32+5:302025-02-19T16:35:35+5:30

How To Make Sindhi Kadhi: बहुतांश बॉलीवूड सेलिब्रिटींना सिंधी कढी हा पदार्थ खूप आवडतो. बघा तो नेमका कसा करायचा.. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ती कढी जरी असली तरी त्यात दही, ताक असं काहीच नसतं..(bollywood celebrities favourite sindhi kadhi recipe)

how to make sindhi kadhi, bollywood celebrities favourite sindhi kadhi recipe | सिंधी कढी रेसिपी: करिना कपूर- सोनाक्षी सिन्हासह बॉलीवूड सेलिब्रिटींचा आवडता पदार्थ, गरमागरम आणि चमचमीत

सिंधी कढी रेसिपी: करिना कपूर- सोनाक्षी सिन्हासह बॉलीवूड सेलिब्रिटींचा आवडता पदार्थ, गरमागरम आणि चमचमीत

Highlightsसेलिब्रिटींच्या तोंडून वारंवार या पदार्थाचं नाव निघत असल्याने तुम्हालाही हा पदार्थ चाखून पाहायचा असेल तर सिंधी कढीची ही खास रेसिपी एकदा बघाच.

बॉलीवूड कलाकारांच्या ज्या काही मुलाखती हाेतात त्यात त्यांना बऱ्याचदा त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ विचारला जातो. हा प्रश्न विचारताच बहुतांश बाॅलीवूड कलाकार सिंधी कढी या पदार्थाचं नाव घेतात. त्यात करिना कपूर, करिश्मा कपूर, सोनाक्षी सिन्हा, अक्षय कुमार, हृतिक रोशन असे अनेक कलाकार आहेत. या सगळ्यांनाच हा पदार्थ खूप आवडतो. सोनाक्षी सिन्हाने तर तिच्या लग्नानंतर एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यात तिने लिहिलं होतं की आज रविवार असल्याने मला माझ्या माहेरच्या घरची खूप आठवण येत आहे. कारण दर रविवारी तिच्या घरी होणाऱ्या तिच्या आईच्या हातची सिंधी कढी तिला खूप खावी वाटत आहे..(how to make sindhi kadhi?) सेलिब्रिटींच्या तोंडून वारंवार या पदार्थाचं नाव निघत असल्याने तुम्हालाही हा पदार्थ चाखून पाहायचा असेल तर सिंधी कढीची ही खास रेसिपी एकदा बघाच..(bollywood celebrities favourite sindhi kadhi recipe)

सिंधी कढी करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ टेबलस्पून तेल

३ ते ४ चमचे बेसन

४ ते ५ भेंडी

कार्बाइडमध्ये पिकवलेली केळी खाणं आरोग्यासाठी धोकादायक! म्हणूनच केळी घेताना लक्षात ठेवा ३ गोष्टी

मोठ्या आकाराचा एक बटाटा

२ टेबलस्पून चिंचेचा कोळ

एका टोमॅटोची प्युरी

अर्धा कप फ्लॉवर

मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण 

चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला 

१ टीस्पून मेथीदाणे, जिरे, मोहरी आणि चिमूटभर हिंग

अर्धा कप गाजराचे तुकडे

शेवग्याच्या काही शेंगा 

 

कृती 

सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घाला आणि मोहरी, जिरे, मेथी दाणे, कडिपत्ता आणि हिंग घालून फोडणी करून घ्या. त्यानंतर त्यात चिमूटभर हळद घाला.

टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल गुलाबाचं रोप, स्वयंपाक घरातले ३ पदार्थ घाला, दुसऱ्या खताची गरजच नाही

यानंतर त्यात बेसन घाला आणि २ ते ३ मिनिटांसाठी खमंग लालसर भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यानंतर त्यात थोडं थोडं करून कोमट पाणी घाला. पाणी एकदम ओतू नका नाहीतर त्यात गाठी होऊ शकतात.

आता या बेसनामध्ये गरम मसाला, लाल तिखट, टोमॅटोची प्युरी, चिंचेचा काेळ आणि जाडसर चिरलेल्या भाज्या घाला. भाज्या तुम्ही अशा पद्धतीनेही घालू शकता किंवा मग थोड्या परतून सुद्धा घालू शकता.

आता मंद आचेवर पुढच्या काही मिनिटांसाठी ही कढी व्यवस्थित उकळू द्या. त्यातल्या भाज्या पुर्णपणे शिजल्या की गॅस बंद करा. गरमागरम सिंधी कढी तयार. 

 

Web Title: how to make sindhi kadhi, bollywood celebrities favourite sindhi kadhi recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.