Join us

सिमला मिरची भाजून ‘अशी’ करा चटकमटक चटणी, मुलांच्या डब्यातही देता येईल अशी भारी चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 17:59 IST

How To Make Simla Mirchi Chutney: सिमला मिरचीची अतिशय चवदार चटणी करता येते. त्याचीच रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(green capsicum chutney recipe by celebrity chef Kunal Kapoor)

ठळक मुद्देपोळी, पराठा, डोसा, थालिपीठ अशा पदार्थांसोबत ती अगदी कमाल लागते.

सिमला मिरचीची भाजी बहुतांश घरांमध्ये नेहमीच केली जाते. कोणी भरलेल्या सिमला मिरचीची भाजी करतात तर कोणी तिला हरबरा डाळीचं पीठ लावून वाफवतात. काही घरांमध्ये शेंगदाण्याचा कूट घालूनही सिमला मिरचीची भाजी केली जाते. तर काही घरांमध्ये ती कांदा, बटाटा, टोमॅटो, पत्ताकोबी, फुलकोबी यांच्यासोबत फ्राय करून खाल्ली जाते. अशी वेगवेगळ्या पद्धतीची सिमला मिरचीची भाजी तुम्ही नेहमीच खात असाल. पण आता मात्र सिमला मिरचीची चटणी खाऊन पाहा. पोळी, पराठा, डोसा, थालिपीठ अशा पदार्थांसोबत ती अगदी कमाल लागते (how to make simla mirchi chutney?). ती नेमकी कशी करायची याची रेसिपी कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(green capsicum chutney recipe by celebrity chef Kunal Kapoor)

सिमला मिरचीची चटणी कशी करायची?

 

साहित्य

२ ते ३ सिमला मिरची

२ ते ३ हिरव्या मिरच्या

१ इंच आल्याचा तुकडा

पावसाळ्यात 'या' रोपांची कटिंग करायलाच हवी! काही दिवसांतच भराभर वाढून खूप फुलून येतील

५ ते ६ लसूण पाकळ्या

अर्ध्या लिंबाचा रस

जिरे पावडर, मिरेपूड, चाट मसाला प्रत्येकी १ टीस्पून

अर्धी वाटी पुदिन्याची पाने आणि अर्धी वाटी कोथिंबीरीची पाने

अर्धी वाटी दही

 

कृती 

सगळ्यात आधी सिमला मिरचीला थोडं तेल लावून घ्या आणि आपण भरीत करताना जसं वांगं भाजतो, तशी सिमला मिरची भाजून घ्या.

यानंतर ती थोडी थंड होऊ द्या. त्यानंतर तिच्यावरचं भाजून घेतल्याचं काळं आवरणं काढून टाका. ती हातानेच थोडी कुस्करून घ्या आणि तिच्यामधल्या बिया, देठ काढून टाका.

मुलांना ५ पदार्थ खाऊ घाला- स्मरणशक्ती वाढून वाचलेलं सगळं लक्षात राहील! अभ्यासात हुशार होतील

आता कुस्करलेली सिमला मिरची, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरेपूड, मिरेपूड, चाट मसाला, दही, पुदिना, कोथिंबीर असं सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून ते अगदी बारीक करून घ्या.

आता बारीक झालेली चटणी एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि या चटणीला वरून मोहरी, हिंग अशी कडक फोडणी घाला. सिमला मिरचीची खमंग चटणी तयार.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.