गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा घरोघरी उत्साहात साजरी केली जाते (Guru Pournima 2025). गुरु- शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस. त्यामुळे अपार श्रद्धेने हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी आपल्या गुरुंना नैवेद्य अर्पण केला जातो. आपापल्या इच्छेनुसार प्रत्येक घरी वेगवेगळा नैवेद्य दाखविला जातो. पण तरीही बहुसंख्य घरांमध्ये यादिवशी शिरा करतात. सत्यनारायणाच्या पुजेसाठी जसा शिरा केला जातो, तसाच शिरा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानेही केला जातो (how to make sheera or suji halva for Guru Pournima naivedya?). पण बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की कधी कधी शिऱ्यामध्ये खूप गाठी होतात तर कधी कधी शिरा अजिबातच गोड नसतो. रवा, साखर, पाणी या ३ पदार्थांचं प्रमाण हुकलं की शिऱ्याची चव बिघडते. म्हणूनच ही रेसिपी घ्या आणि शिरा करून पाहा. प्रत्येकजण तुम्ही तयार केलेल्या नैवेद्याचं कौतूक करेल..(ravyacha sheera recipe in Marathi)
नैवेद्याचा शिरा कसा करावा?
साहित्य
१ वाटी रवा
पाव ते अर्धी वाटी तूप
१ वाटी साखर
बोले चूड़ियां..! येत्या श्रावणात भरा चमचमत्या नव्या बांगड्या, पाहा ६ नवीन सुंदर डिझाइन्स!
३ ते ४ वाट्या दूध
चिमूटभर जायफळाची पावडर आणि वेलची पावडर
७ ते ८ केशराच्या काड्या
१ टेबलस्पून सुकामेव्याचे काप
कृती
शिरा करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये रवा घालून तो मंद ते मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत खमंग परतून घ्या.
मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल
एका वाटीमध्ये गरम दूध घ्या आणि त्यामध्ये केशराच्या काड्या भिजायला घालून ठेवा. शिऱ्यासाठी लागणारं दूध गरम करून ठेवा.
यानंतर एका छोट्या कढईमध्ये चमचाभर तूप घाला आणि त्यामध्ये सुकामेव्याचे काप घालून ते तळून घ्या.
रवा खमंग परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळूहळू दूध घाला. दूध घालताना गॅस अगदी मंद ठेवा. तसेच दूध घालताना एकीकडे कढईतला रवा कायम हलवत राहा. यामुळे गाठी होत नाहीत. शिऱ्यामध्ये दूध घालणे आणि त्याचवेळी कढईतला रवा हलवणे हे काम परफेक्ट जमलं की शिऱ्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत.
डोक्याच्या समोरच्या भागातले केस गळून टक्कल पडू लागलं? करा कोथिंबिरीचा उपाय, केस वाढतील भराभर
आता शिऱ्यामधलं दूध आटत आल्यानंतर त्यामध्ये साखर, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि तूपात तळून घेतलेला सुकामेवा घाला. सगळं व्यवस्थित हलवून चांगली वाफ येऊ द्या. शिरा झाल्यानंतर गॅस बंद करा आणि पुन्हा एकदा वरतून २ ते ३ चमचे साजूक तूप घाला. नैवेद्याचा शिरा झाला तयार..