Join us

गणेशोत्सव: तळणीच्या मोदकासाठी परफेक्ट सारण कसं करायचं? घ्या रेसिपी- मोदक होतील खमंग, चवदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 15:41 IST

How to Make Saran or Feeling for Modak?: तळणीचे मोदक करणार असाल तर त्याचं सारण तयार करण्यासाठी या काही खास टिप्स..(how to make talniche modak?)

ठळक मुद्देया पद्धतीने तयार केलेलं मोदकाचं सारण अतिशय चवदार होतं. एकदा ट्राय करून पाहा. 

गणेशोत्सव आता लवकरच सुरू होत आहे (Ganpati Festival 2025). गणपतीच्या स्वागतासाठी सगळीकडेच प्रचंड उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. बाजारपेठा गणपती डेकोरेशन, पूजा यासाठी लागणाऱ्या साहित्याने सजल्या आहेत. तर गणेश मंडळांची तयारीही अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्याचप्रमाणे घरोघरीही गणपती उत्सवाच्या तयारीला आता वेग आला आहे. नैवेद्याच्या मोदकांसाठी लागणारे पदार्थ, रेसिपी या सगळ्यांमध्ये महिलावर्ग दंग आहे. आता बहुसंख्य घरांमध्ये गणपतीच्या नैवेद्यासाठी तळणीचे माेदक केले जातात. पण काही जणींच्या बाबतीत असं होतं की त्यांनी केलेले मोदक एक तर खूपच कमी गोड होतात किंवा मग त्यातल्या सारणाची चव हुकते. त्यामुळे मोदक चवदार होत नाहीत. असं काही तुमच्याबाबतीत होत असेल तर तळणीच्या मोदकांसाठी सारण कसं तयार करायचं (How to Make Saran or Feeling for Modak?), याची ही रेसिपी पाहा..(how to make talniche modak?)

तळणीच्या मोदकासाठी सारण कसं तयार करायचं?

 

साहित्य

१ वाटी खोबऱ्याचा किस

अर्धी वाटी गूळ

मोदक तळताना कढईतच फुटतात? ४ टिप्स- छान खरपूस-खमंग तळा मोदक-फुटायचं टेंशन नाही..

१ चमचा खसखस

१ टीस्पून वेलची पूड किंवा जायफळ पावडर

कृती

सारण तयार करण्यासाठी सगळ्यात आधी गूळ किसून अगदी बारीक करून घ्या.

 

यानंतर त्यामध्ये खोबरे किसून घ्या. खोबरे किसण्यासाठी बारीक छिद्रं असणारी किसनी वापरा. कारण खोबरं जर जाडसर, टोकदार राहिलं तर त्यामुळे मोदक तळताना फुटण्याची शक्यता जास्त असतं.

१० दिवस उत्तम टिकणाऱ्या स्वादिष्ट खिरापतीची खास रेसिपी- खिरापत खाऊन सगळेच होतील खुश

खोबरे कढईमध्ये अगदी मंद आचेवर भाजून घ्या. खोबरे भाजत आले की त्यामध्येच खसखस घालून ती देखील भाजून घ्या. 

जेव्हा खसखस आणि खोबरे दोन्हीही थंड होईल, तेव्हा त्यामध्ये किसलेला गूळ घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि अगदी शेवटी त्यामध्ये वेलची पूड किंवा जायफळाची पावडर घाला. या पद्धतीने तयार केलेलं मोदकाचं सारण अतिशय चवदार होतं. एकदा ट्राय करून पाहा. 

 

टॅग्स :गणेशोत्सव 2025पाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न