Join us

सॅण्डविच करताना ब्रेडला लावा ‘हा’ पदार्थ, मेयोनिजची गरजच नाही आणि प्रोटीनही मिळेल भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 16:04 IST

How To Make Sandwich More Delicious: सॅण्डविच करताना जर तुम्ही ब्रेड स्प्रेड म्हणून पुढे सांगितलेला एक खास पदार्थ वापरला तर सॅण्डविच जास्त चवदार आणि पौष्टिक होईल...(how to make sandwich spread or bread spread at home?)

ठळक मुद्देघरच्याघरीच ब्रेड स्प्रेड तयार केलं तर तुम्ही केलेलं सॅण्डविच भरपूर प्रोटीन्स देणारं होईल शिवाय ते नेहमीपेक्षा जास्त चवदार होईल.

सॅण्डविच हा घरातल्या सगळ्याच मंडळींचा अतिशय आवडीचा पदार्थ.. कित्येक घरांमध्ये तर सकाळच्या धावपळीत नाश्त्याला सॅण्डविच हमखास केले जातात. कोणी ते ग्रील करतात तर कोणी ते तसेच खातात. भरपूर भाज्या घालून केलेले सॅण्डविच मुलांना डब्यात द्यायलाही चांगले आहेत. कारण त्यातून बऱ्याच भाज्या मुलांच्या पोटात जातात. सॅण्डविचला अधिक चवदार करायचं असेल तर त्याला आपण मेयोनिज, चीज असे विकतचे पदार्थ लावतो. पण त्याऐवजी तुम्ही पनीरचा वापर करून घरच्याघरीच ब्रेड स्प्रेड तयार केलं तर तुम्ही केलेलं सॅण्डविच भरपूर प्रोटीन्स देणारं होईल शिवाय ते नेहमीपेक्षा जास्त चवदार होईल (How To Make Sandwich More Delicious?). या पद्धतीने सॅण्डविच केल्यास मेयोनिज आणि चीज वापरण्याचीही गरज पडत नाही. बघा त्यासाठी काय करायचं..(How to make sandwich spread or bread spread at home?)

 

सॅण्डविचसाठी पनीरचे ब्रेड स्प्रेड कसे तयार करायचे?

साहित्य

पनीर २०० ग्रॅम

२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

४ चमचे बारीक चिरलेला पुदिना

पावसात भिजून केस ओले राहिल्याने उवा होतात? काय खरं आणि उवा झाल्याच तर करायचं काय?

१ हिरवी मिरची

लसूणाच्या ५ ते ६ पाकळ्या भाजून घेतलेल्या

चवीनुसार मीठ

२ टेबलस्पून लिंबाचा रस

 

कृती

पनीरपासून ब्रेड स्प्रेड तयार करण्यासाठी सगळ्यात आधी पनीरचे बारीक तुकडे करून घ्या. 

एका छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून लसूण पाकळ्या परतून घ्या.

दाढ ठणकू लागली? लगेच औषधं- गोळ्या नको, 'हा' उपाय करून पाहा- १५ मिनिटांत दुखणं थांबेल

त्यानंतर पनीर, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदिना, लिंबाचा रस आणि मीठ असं सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि अगदी बारीक करून घ्या.

 

आता बारीक केलेलं मिश्रण एखाद्या एअर टाईट डब्यामध्ये भरून एक तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.

भुमी पेडणेकर ते विद्या बालन.. कोणी १५ तर कोणी २५ किलोने वजन घटवलं! कसं जमलं त्यांना?

यानंतर हे मिश्रण थोडं घट्ट होईल. आता जेव्हा तुम्ही सॅण्डविच कराल तेव्हा हे मिश्रण एका स्लाईसला लावून दुसऱ्या स्लाईसला टॉमेटॉ सॉस लावा. दोन्हींच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाज्या भरा. पुदिना फ्लेवरचं मस्त सॅण्डविच तयार.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स