इडली सांबार हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. हा पदार्थ असा आहे की तो नाश्त्यामध्ये दिला तरी चालतो आणि काही जणांना तर तो रात्रीच्या जेवणातही आवडतो. लहान मुलांमध्येही हा मेन्यू ऑल टाईम हिट आहे.. आता इडली सांबार करताना बहुतांश जणींना अशी अडचण येते की उडपी हॉटेलमध्ये किंवा मग दक्षिण भारतात ज्या चवीचा सांबार मिळतो, तशी चव आपल्या घरच्या सांबारला येत नाही. त्यामुळे मग इडली सांबारची खरी मजा येतच नाही. असंच तुमचंही म्हणणं असेल तर पुढे शेअर केलेली एक रेसिपी पाहाच..(how to make sambar masala at home?) आता दक्षिण भारतात आपल्यासारखा रेडिमेड सांबार मसाला घालत नाही. तिथे एक घरगुती मसाला तयार केला जातो आणि तोच सांबारमध्ये घातला जातो. तो मसाला नेमका कसा करायचा आणि त्यासाठी कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यायचे ते पाहूया..(South Indian style sambar masala recipe)
दक्षिण भारतीय पद्धतीने सांबार मसाला करण्याची रेसिपी
सांबार मसाला तयार करण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये २ चमचे धणे, १ चमचा जिरे, अर्धा चमचा मेथ्या, अर्धा चमचा मोहरीचे दाणे मंद आचेवर चांगले भाजून घ्या. जेव्हा मसाले भाजण्याचा हलका सुगंध दरवळू लागेल तेव्हा ते कढईतून बाहेर काढा.
विकतच्या क्रिमची गरजच नाही- घरीच बनवा तुरटीचं क्रीम, पिंपल्स- टॅनिंग जाऊन त्वचेवर येईल सुंदर चमक
यानंतर कडिपत्त्याची १० ते १२ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली पानेही कढईत टाकून भाजून घ्या. पानांमधला ओलावा जाऊन जेव्हा ते कुरकुरीत होतील तेव्हा ती कढईतून बाहेर काढून घ्या. यानंतर वाळलेल्या २ ते ३ लाल मिरच्या आणि पाव चमचा मिरेही हलके भाजून घ्या.
सगळे मसाले भाजून झाल्यानंतर कढईमध्ये ३ चमचे हरबऱ्याची डाळ आणि २ चमचे उडीद डाळा घाला. आणि ती देखील मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या. फक्त भाजत असताना डाळ करपणार नाही याची काळजी घ्या. भाजून घेतलेले मसाले, डाळी थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये घाला.
रामनवमीला नीता अंबानींनी नेसली रामशीला साडी, वाचा या इकत साडीची खासियत, पाहा व्हायरल फोटो
त्यात थोडी हळद आणि हिंग घालून त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या. मसाले तुम्ही जेवढे बारीक कराल तेवढा त्याचा स्वाद जास्त येतो. हा मसाला एखाद्या बरणीमध्ये घालून ठेवा. ४ ते ५ महिने चांगला राहील. सांबार करताना विकतच्या मसाल्याऐवजी हाच मसाला घाला. छान स्वाद येईल.
Web Summary : Tired of store-bought sambar masala? This South Indian recipe teaches you how to make an authentic, flavorful spice blend at home using simple ingredients like coriander seeds, cumin, and lentils. This homemade masala elevates your sambar with a true South Indian taste.
Web Summary : स्टोर से खरीदे सांबर मसाला से थक गए हैं? यह साउथ इंडियन रेसिपी आपको सिखाती है कि घर पर धनिया के बीज, जीरा और दाल जैसे सरल सामग्री का उपयोग करके एक प्रामाणिक, स्वादिष्ट मसाला मिश्रण कैसे बनाया जाए। यह होममेड मसाला आपके सांबर को असली साउथ इंडियन स्वाद के साथ बढ़ाता है।