Join us

साबुदाण्याची भेळ कधी खाल्ली आहे का? खिचडी आणि वडे खाऊन पित्त होत असेल तर भेळ हा उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2024 18:19 IST

How To Make Sabudana Bhel | Easy Sabudana Bhel Recipe Video : चमचाभर तेलात करा साबुदाण्याची चटपटीत भेळ, खिचडी आणि वड्याला उत्तम-चविष्ट पर्याय..

महाराष्ट्रात उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचे विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. साबुदाणा खिचडी, वडे, खीर, थालीपीठ, यासह विविध प्रयोग त्यावर केले जातात. साबुदाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. साबुदाण्याचे कोणताही प्रकार आपण आवडीने खातो. पण आपण कधी साबुदाण्याची भेळ करून खाली आहे का? आता तुम्ही म्हणाल हा काय नवीन प्रकार? मुरमुऱ्याची भेळ आपण चाट म्हणून खातो (Cooking Tips).

पण जर आपल्याला खिचडी, वडे आणि खिरीव्यतिरिक्त हटके खायचं असेल तर, एकदा साबुदाण्याची भेळ करून पाहा (Sabudana Bhel). खायला चटपटीत बनवायला सोपी अशीही भेळ कमी वेळात तयार होते. चला तर मग साबुदाण्याची भेळ कशी तयार करायची पाहूयात(How To Make Sabudana Bhel | Easy Sabudana Bhel Recipe Video).

साबुदाण्याची भेळ करण्यासाठी लागणारं साहित्य

साबुदाणा

पाणी

हिरव्या मिरच्या

बटाटे

तेल

शेंगदाणे

मीठ

किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी रोज किती ग्लास पाणी प्यावे? पाणी प्यायल्याने धोका टळतो?

लाल तिखट

लिंबाचा रस

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात साबुदाणा निवडून धुवून घ्या. त्यात थोडं पाणी घालून त्यावर  झाकण ठेवा. ५ ते ६ तासानंतर साबुदाणा भिजले आहेत की नाही हे चेक करा. आता एका कढईत थोडं पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर चाळण ठेवा. त्यात दाणेदार साबुदाणा घालून पसरवा. त्यात ४ ते ५ हिरव्या मिरच्या, बटाट्याचे तुकडे, एक चमचा तेल घालून मिक्स करा. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेऊन वाफेवर शिजवून घ्या.

उन्हाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते? रामदेव बाबा सांगतात ६ सोपे बदल; पचेल अन्न-राहाल निरोगी

एका मिक्सरच्या भांड्यात एक कप भाजलेले शेंगदाणे घालून कूट तयार करून घ्या. १० मिनिटानंतर भांडयावरील झाकण काढून त्यातील हिरव्या मिरच्या वेचून काढा. खलबत्त्यात मिरच्या घालून ठेचून घ्या. वाफेवर शिजवून घेतलेला साबुदाणा एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बटाटे, शेंगदाण्याचं कूट, ठेचलेल्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट घालून सर्व साहित्य एकजीव करा. शेवटी एक चमचा लिंबाचा रस आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे चटपटीत साबुदाण्याची भेळ खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स