Join us

रोज फोडणीचा भात कशाला? भात उरला तर करा भाताचा ढोकळा झटपट; नाश्ता स्पेशल खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 16:18 IST

How To Make Rice Dhokla | Easy Rice Dhokla Recipe : ढोकळा फसतो- फुगतच नसेल तर, 'या' पद्धतीने जाळीदार उरलेल्या भाताचा ढोकळा करून पाहा..

ढोकळ्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. फक्त गुजराथी नसून, महारष्ट्रात देखील आवर्जुन हा पदार्थ खाल्ला जातो (Dhokla Recipe). खमण ढोकळा विविध प्रकारे केले जाते. काही लोकं डाळ किंवा बेसनाचा ढोकळा तयार करतात. पण आपण कधी उरलेल्या भाताचा ढोकळा खाऊन पाहिलं आहे का? उरलेल्या भाताला फोडणी देऊन खातो, किंवा त्याचे कटलेट तयार करतो.

उरलेला भात कोणाला आवडत नाही (Food). भात खाताना लोक नाकं मुरडतात. त्यामुळे फेकून देण्याऐवजी, किंवा खराब होण्यापेक्षा आपण त्याचा जाळीदार चविष्ट ढोकळा करून खाऊ शकता. झटपट इन्स्टंट रेसिपी काही मिनिटात तयार होते. शिवाय आवडीने हा ढोकळा फस्त देखील होईल, यात काही शंका नाही(How To Make Rice Dhokla | Easy Rice Dhokla Recipe).

उरलेल्या भाताचे करा जाळीदार स्पाँजी ढोकळा

लागणारं साहित्य

उरलेला भात

दही

पाणी

रवा

मीठ

इनो

महागडे लिंबू विकत आणता, पण त्यातून रसच निघत नाही? ४ ट्रिक्स; रसाळ लिंबू विकत आणण्याची खास ट्रिक

तेल

जिरे

मोहरी

कडीपत्ता

पांढरे तीळ

हिरवी मिरची

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक वाटी उरलेला भात घ्या. त्यात एक कप दही, एक कप पाणी घालून वाटून घ्या. गुळगुळीत पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात एक कप रवा घालून व्हिस्करने मिक्स करा.

पेस्टमध्ये रवा मिक्स केल्यानंतर त्यात गुठळ्या तयार होणार नाही, याची काळजी घ्या. आता त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात स्टॅण्ड ठेवा. एका ताटाला ब्रशने तेल लावा. तयार बॅटरमध्ये एक चमचा इनो घाला आणि त्यावर २ चमचे पाणी घालून चमच्याने मिक्स करा.

टपरीवर मिळतात तशी टम्म फुगलेली बटाट्याची भजी करायची आहेत? पिठात घाला ‘हा’ पदार्थ, खा कुरकुरीत भजी

तयार बॅटर ब्रशने तेल लावलेल्या ताटामध्ये ओता. त्यावर चिमुटभर लाल तिखट शिंपडा. ताट स्टॅण्डवर ठेवा. आणि झाकणने कव्हर करा. ढोकळा वाफेवर १० मिनिटांसाठी शिजवून घ्या.

१० मिनिटानंतर गॅस बंद करा. ताट बाहेर काढून, ढोकळा कट करा. एका कढईत एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, मोहरी, कडीपत्ता, एक चमचा पांढरे तीळ, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून मिक्स करा. नंतर त्यात कट केलेला ढोकळा घालून परतवून घ्या. अशा प्रकारे उरलेल्या भाताचा ढोकळा खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स