Join us  

घरच्याघरी कुकरमध्ये तयार केली हॉटेलपेक्षाही भारी तंदूर रोटी, बघा भन्नाट रेसिपीचा व्हायरल व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2024 3:32 PM

How To Make Restaurant Style Tandoor Roti At Home: घरीच तंंदूर रोटीचा बेत करायचा असेल तर सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ बघाच...

ठळक मुद्देसध्या सोशल मिडियावर कुकरमध्ये तंदूर रोटी करण्याचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

हॉटेलमध्ये गेल्यावर मस्त मसालेदार भाज्यांसोबत गरमागरम तंदूर रोटी खायला अनेकांना आवडते. तंदूर रोटी आणि चमचमीत भाज्या असं जेवायला असेल तर मग जेवणाचा आनंद काही विचारायलाच नको. बऱ्याचदा घरी आपण एखादी मस्त चवदार, झणझणीत भाजी केली की त्याच्यासोबत हॉटेलसारखी गरमागरम तंदूर रोटी असायला पाहिजे होती, असं हमखास वाटून जातं. तुम्हालाही असं कधी वाटलंच तर आता हा एक व्हिडिओ पाहून ठेवा (dhaba style tandoor roti recipe) आणि घरच्याघरी कुकर वापरून तंदूर रोटी कशी करायची बघा... (How to make restaurant style tandoor roti at home)

 

सध्या सोशल मिडियावर कुकरमध्ये तंदूर रोटी करण्याचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. Harish Chauhan या सोशल मिडिया हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

तेलाची बरणी आतून तेलकट- चिकट झाली? १ सोपा उपाय- कमी मेहनतीत बाटली होईल चकाचक 

त्या व्हिडिओमध्ये जे काही कॅप्शन दिलं आहे, त्यावरून असं दिसतं की त्या महिलेच्या पतीला तंदूर रोटी खाण्याची इच्छा झाली. म्हणूनच त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी तिने मग पदर खोचला आणि घरीच तंदूर रोटी करण्याचा जबरदस्त प्रयोग केला. तिने लढवलेली शक्कल खरोखरच भारी असून तुम्हीही हा प्रयोग घरी नक्कीच करून पाहू शकता.

 

तंदूर रोटी करण्याची रेसिपी 

त्या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की त्या महिलेने आधी तंदूर रोटी लाटून घेतली. त्यानंतर तिला एका बाजुने पाणी लावले आणि मग ती कुकरला चिटकवून दिली. अशा पद्धतीने तिने छोट्या छोट्या ३ रोट्या कुकरमध्ये चिटकवल्या.

काही सेकंदातच चमकतील तांब्यांची भांडी, घासण्याचीही गरज नाही- फक्त 'या' जादुई पाण्यात टाकून कमाल पाहा

त्यानंतर गॅस मोठा केला आणि तो कूकर गॅसवर उलटा ठेवला. त्यामुळे मग आतून शेगडीची वाफ आणि दुसऱ्या बाजुने गरम झालेलं कुकर अशा पद्धतीने ती रोटी मग चांगली भाजली गेली. खरोखरच हा प्रयोग अतिशय छान असून ट्राय करून पाहायला हरकत नाही. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.सोशल व्हायरलपाककृती