Join us

रेस्टॉरंटसारखी चमचमीत भाजी हवी? 'या' पद्धतीने ग्रेव्ही करा- भाज्या होतील सुपरटेस्टी, घ्या सिक्रेट रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 12:38 IST

How To Make Restaurant Style Gravy At Home: रेस्टॉरंटमध्ये मिळतात अगदी तशाच चवीच्या भाज्या घरीच करायच्या असतील तर मास्टरशेफ सांगत आहेत त्या पद्धतीने ग्रेव्ही करा.(how to make gravy for spicy sabji?)

ठळक मुद्दे ही ग्रेव्ही थंड झाल्यानंतर तुम्ही एअर टाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. ती लवकर खराब होत नाही.

घरी कितीही चवदार भाज्या केल्या तरी त्या भाज्यांना काही रेस्टॉरंटच्या भाज्यांसारखी चव येत नाही, असं अनेकांचं म्हणणं असतं. पण तुमचं आणि तुमच्या घरातल्या सदस्यांचंही तेच म्हणणं असेल तर त्यांना या पद्धतीने केलेल्या ग्रेव्हीची भाजी एकदा खाऊ घाला. भाजी एवढी चवदार होईल की वारंवार हॉटेलच्या भाज्या मागवणंच विसरून जाल (how to make restaurant style sabji at home?). शिवाय या ग्रेव्हीची खासियत अशी की त्या एकाच प्रकारच्या ग्रेव्हीमधून आपण कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकतो. या ग्रेव्हीचा आणखी एक मुख्य फायदा म्हणजे एकदा जर तुम्ही ग्रेव्ही करून ठेवली तर ती पुढे महिनाभर फ्रिजमध्ये चांगली टिकू शकते. त्यामुळे वारंवार ग्रेव्ही करत बसण्याची गरज नाही (how to make restaurant style gravy at home?). आणि ग्रेव्ही हाताशी तयार असली की मसालेदार भाज्याही अगदी झटपट करता येतात.(how to make gravy for spicy sabji?)

 

रेस्टॉरंटप्रमाणे भाज्यांची ग्रेव्ही कशी तयार करायची?

याची रेसिपी honest.kitchen.chefbhupi या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

५ ते ६ टेबलस्पून तेल

१५ ते २० लसूण पाकळ्या

एक ते दिड इंच आल्याचा तुकडा

पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नसल्याने त्यांना कुबट वास येतो? ३ टिप्स- कपड्यांची दुर्गंधी जाईल 

५ ते ६ कांदा

१ किलो टोमॅटो

१ चमचा हळद आणि धनेपूड, 

१ चमचा किचन किंग मसाला

चवीनुसार लाल तिखट

 

कृती

सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढईमध्ये तेल घाला आणि ते गरम होऊ द्या.

तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि चिरलेला कांदा घालून हलकंसं परतून घ्या. कांदे परतून झाले की त्यामध्ये जाड जाड चिरलेले टोमॅटो घाला.

साडीचा काठ लावून ब्लाऊज शिवण्याच्या ९ क्लासिक आयडिया! ब्लाऊज दिसेल एकदम हटके, स्टायलिश

थोडंसं मीठ घालून सगळं एकदा परतून घ्या आणि कढईवर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या.

जोपर्यंत टोमॅटो एकदम मऊ होत नाहीत तो पर्यंत ते चांगले वाफवून घ्यावे. वाफवून घेताना अधूनमधून मिश्रण सतत हलवत राहावे.

 

टोमॅटो पुर्णपणे मऊ झाले आणि त्यांचा कच्चा वास गेला की गॅस बंद करा. कढईतलं मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक प्युरी करून घ्या.

घरच्याघरी ब्लीच करणं आता झालं सोपं! 'या' पद्धतीने बटाटा वापरा- चेहरा होईल स्वच्छ, फ्रेश

तोपर्यंत एका वाटीमध्ये हळद, धने पावडर, तिखट आणि किचन किंग मसाला एकत्र करा आणि थोडं पाणी घालून कालवून घ्या. आता पुन्हा एकदा गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घालून मसाल्यांची पेस्ट त्यात परतून घ्या. यानंतर आपण तयार केलेली ग्रेव्ही घालून ती ८ ते १० मिनिटे उकळवून घ्या. ही ग्रेव्ही थंड झाल्यानंतर तुम्ही एअर टाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. ती लवकर खराब होत नाही. 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.