आपलं एखादं आवडीचं रेस्टॉरंट असतं आणि त्या रेस्टॉरंटमधली एखादी पंजाबी भाजी आपल्याला खूप आवडत असते. आपण दरवेळी त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो की आपल्या आवडीची भाजी आवर्जून मागवतो. त्या भाजीची ती खास चव आपल्याला सुखावून टाकते. अशावेळी कधी कधी प्रश्न पडतो की आपण दरवेळी इथे येऊन जेव्हा जेव्हा ही भाजी खातो तेव्हा तेव्हा प्रत्येकवेळी तिची चव एकसारखीच कशी लागते (how to make restaurant style gravy at home?). त्याच प्रश्नाचं हे बघा उत्तर..(restaurant style gravy recipe) हीच ट्रिक तुम्ही घरीही करू शकता..(cooking tips for restaurant style thick and tasty gravy)
रेस्टॉरंटमध्ये कशा पद्धतीने भाज्यांची ग्रेव्ही केली जाते?
आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि ऑर्डर केली की मग कूक स्वयंपाकाच्या तयारीला लागतात असं होत नाही. त्यांची भाज्यांची प्राथमिक तयारी आधीच झालेली असते. हॉटेलमध्ये एकाच वेळी पुढचे काही दिवस पुरेल एवढी ग्रेव्ही केली जाते आणि ती छोट्या छोट्या एअर टाईट डब्यांमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवली जाते.
चेहरा नेहमीच सुजलेला दिसतो? नेहा धुपियाने सांगितलेला उपाय करा- पोट, दंड, मांड्यांवरची चरबीही उतरेल
गरजेनुसार ग्रेव्ही काढून तिच्यामध्ये आपण सांगू त्या भाज्या, पनीर, कोफ्ता घालून ती गरम केली जाते. त्या ग्रेव्हीमधल्या पदार्थांचं प्रमाण ठरलेलं असतं. त्यामुळे तिची चव बदलत नाही. या पद्धतीची ग्रेव्ही तुम्ही घरीही करून ठेवू शकता आणि पुढच्या ८ दिवसांत ती वापरू शकता. जेणेकरून तुमच्या अगदी मसालेदार भाज्याही झटपट तयार होतील. खूप तयारी करत बसण्याची गरज नाही. आता अशी ग्रेव्ही घरी कशी करायची ते पाहूया..
रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही घरी कशी करायची?
रेस्टॉरंटस्टाईल ग्रेव्ही घरी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये बटर आणि तेल सम प्रमाणात घाला. आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो, २ मध्यम आकाराचे कांदे जाडसर कापून घ्या आणि ते कढईमध्ये परतायला घाला.
नव्या वर्षात झटपट वेटलॉस करण्यासाठी ७ साधे- सोपे उपाय, काही महिन्यांतच व्हाल एकदम फिट, स्लिम
यानंतर त्यात आल्याचे काप, लसूण पाकळ्या, १० ते १२ काजू, दालचिनीचा तुकडा घाला.. सगळं परतून झालं की गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. यानंतर ती मिक्सरमधून काढा. पुन्हा कढईमध्ये तेल घाला. त्यात जिरेपूड, हळद, मोठी वेलची, मिरेपूड, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट घालून ग्रेव्ही उकळवून घ्या. यानंतर थंड झाल्यावर एअर टाईट डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवून द्या. झटपट भाज्या करण्यासाठी ही इंस्टंट ग्रेव्ही तयार.
