Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > काय सांगता, वांग्याची भजी कधीच खाल्ली नाही? पाहा रेसिपी, खा कुरकुरीत चविष्ट भजी

काय सांगता, वांग्याची भजी कधीच खाल्ली नाही? पाहा रेसिपी, खा कुरकुरीत चविष्ट भजी

How to make restaurant style Brinjal Pakoda at home : सोप्या पद्धतीने झटपट बनवा वांग्याची कुरकुरीत भजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2024 15:34 IST2024-06-05T12:24:25+5:302024-06-05T15:34:27+5:30

How to make restaurant style Brinjal Pakoda at home : सोप्या पद्धतीने झटपट बनवा वांग्याची कुरकुरीत भजी

How to make restaurant style Brinjal Pakoda at home | काय सांगता, वांग्याची भजी कधीच खाल्ली नाही? पाहा रेसिपी, खा कुरकुरीत चविष्ट भजी

काय सांगता, वांग्याची भजी कधीच खाल्ली नाही? पाहा रेसिपी, खा कुरकुरीत चविष्ट भजी

वांगी (Pakoda Recipe) ही एक अतिशय सामान्य भाजी आहे (Eggplant). परंतु, काही लोकांना वांगी आवडत नाही (Food). वांगी व त्यापासून तयार पदार्थ खाणं काही लोक टाळतात (Cooking Tips). पण ही भाजी सामान्य जरी असली तरी, वांगी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात (Kitchen Tips). वांगीमध्ये व्हिटॅमिन्स, फायबर, मॅग्नेशियम, नियासिन आणि मॅग्नेशियम आढळते.

जे लोक हे नियमितपणे खातात त्यांना आरोग्याच्या निगडीत बरेच फायदे मिळतात. जर आपल्याला वांग्याची भाजी किंवा वांग्याचे पदार्थ आवडत नसतील तर, वांग्याची भजी करून पाहा. आपण बटाटा किंवा कांद्याची भजी करतोच. पण एकदा वांग्याची भजी करून पाहा. वरण - भाताबरोबर वांग्याची भजी आपल्याला नक्कीच आवडेल(How to make restaurant style Brinjal Pakoda at home).

वांग्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

वांगी

बेसन

तांदुळाचं पीठ

लाल तिखट

निकाल लागले, टेन्शन कमी झालं आता प्या मन आणि शरीराला थंडावा देणारं ताडगोळ्याचं सरबत; पाहा सोपी कृती..

मीठ

हळद

आलं - हिरवी मिरचीची पेस्ट

जिरे पावडर

कृती

वांग्याची भजी करण्यासाठी सर्वात आधी वांग्याचे गोल काप करून घ्या. वांग्याच्या कापांच्या मधोमध चीर पाडा. एका बाऊलमध्ये पाणी घ्या. आता वांग्याच्या कापांवर अर्धा चमचा लाल तिखट, मीठ आणि हळद दोन्ही बाजूने लावा.

मेदूवडे फसतात-तेल फार पितात? त्यात मिसळा '१' खास पदार्थ; मेदूवडे जमतील परफेक्ट

एका बाऊलमध्ये एक कप बेसन, अर्धा कप तांदुळाचं पीठ, एक चमचा आलं - हिरवी मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद, अर्धा टेबलस्पून जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा.

एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर बॅटरमध्ये वांग्याचे काप बुडवून तेलामध्ये सोडा, व दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून घ्या. अशा प्रकारे वांग्याची कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी.

Web Title: How to make restaurant style Brinjal Pakoda at home