दिवाळी आता जवळ आल्यामुळे घरोघरी फराळाची तयारी सुरू झालेली आहे. अशातच तुम्हीही फराळ करायला सुरुवात केली असेल आणि त्यातही पारंपरिक पद्धतीने होणारे पाकातले रवा लाडू करण्याचा तुमचा विचार असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. कारण पाकातले रव्याचे लाडू करणाऱ्या बऱ्याच जणींना असा अनुभव येतो की कधी कधी साखरेचा पाक कच्चा राहातो तर कधी कधी तो जास्त शिजतो. या दोन्ही प्रकारात लाडू बिघडतात. कधी अगदीच ठिसूळ होतात तर कधी तुटता तुटत नाहीत. हे सगळं टाळण्यासाठी लाडूचा पाक परफेक्ट होणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(traditional method of making rava ladoo in sugar syrup)
पाकाचे रव्याचे लाडू करण्याची रेसिपी
पाकाचे रव्याचे लाडू करण्याची रेसिपी Sarita's Kitchen या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे.
साहित्य
बारीक रवा ४ कप
दिवाळीसाठी सोन्याचांदीच्या दागिन्यांना घरीच करा पॉलिश, ३ उपाय- दागिने नव्यासारखे लख्खं चमकतील..
साजूक तूप १ कप
साखर अडीच कप
वेलची पूड १/२ टीस्पून
सुकामेव्याचे काप १ टेबलस्पून
कृती
रवा भाजण्यासाठी गॅसवर कढई ठेवा. त्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई घ्यावी. जेणेकरून रवा जळत नाही. तसेच लाडू करण्यासाठी नेहमी बारीक रवा वापरावा. कढई गरम झाल्यानंतर त्यात तूप घाला आणि तूप वितळल्यानंतर रवा घालून तो मंद आचेवर भाजून घ्या. रवा भाजत असताना त्यात अधूनमधून तूप घालावे.
कपडे, दागिने मॅचिंग- मॅचिंग घालण्याची फॅशन आता गेली! पाहा कपड्यांच्या रंगानुसार कसे निवडायचे दागिने
रवा भाजल्यानंतर गॅसवर पातेले गरम करायला ठेवा. त्यात साखर घाला. साखरेच्यावर अगदी थोडंसं येईल एवढं पाणी त्यात घाला आणि त्याचा पाक करून घ्या. एकतारी पाक झाला की गॅस बंद करा. आता हा गरमगरम पाक भाजून थंड झालेल्या रव्यामध्ये घाला. पाक घालत असताना रवा सारखा हलवत राहा. सुरुवातीला मिश्रण पातळ झाल्यासारखं वाटेल पण हळूहळू ते आळून येईल. मिश्रण आळून आलं की त्याचे लाडू वळून घ्या.