Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ढाबा स्टाईल पंजाबी लस्सी करण्याची खास रेसिपी, चव अशी भारी की रोजच करून प्यावी.. 

ढाबा स्टाईल पंजाबी लस्सी करण्याची खास रेसिपी, चव अशी भारी की रोजच करून प्यावी.. 

Punjab Special Lassi Recipe: अस्सल पंजाब स्टाईलची लस्सी आवडत असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा...(how to make punjab style lassi at home?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 16:54 IST2026-04-13T16:53:41+5:302026-04-13T16:54:27+5:30

Punjab Special Lassi Recipe: अस्सल पंजाब स्टाईलची लस्सी आवडत असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा...(how to make punjab style lassi at home?)

how to make punjab style lassi at home, punjab special lassi recipe, how to make punjab special lassi, summer special lassi | ढाबा स्टाईल पंजाबी लस्सी करण्याची खास रेसिपी, चव अशी भारी की रोजच करून प्यावी.. 

ढाबा स्टाईल पंजाबी लस्सी करण्याची खास रेसिपी, चव अशी भारी की रोजच करून प्यावी.. 

उन्हाळा असल्यामुळे गारेगार पदार्थ हमखास खावेसे वाटतात. आईस्क्रिम, कुल्फी, ताक असे पदार्थ तर असतातच पण त्यांच्या जोडीला कधी कधी मिल्कशेक आणि थंडगार लस्सीही प्यावी वाटते. आता लस्सी तर बरेच जण घरी करतात. पण त्या घरच्या लस्सीला ढाब्यावर मिळते तशा पंजाबी स्टाईल लस्सीची चव येतच नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. आता तेवढीच लस्सी पिण्यासाठी दरवेळी ढाब्यावर जाणंही शक्य नसतं. म्हणूनच ही एक खास रेसिपी करून पाहा (punjab special lassi recipe). अगदी ढाब्यावर मिळते तशी पंजाबी लस्सी तुम्हाला घरीच करता येईल. एकदा करून बघाच...(how to make punjab style lassi at home?)

 

ढाबा स्टाईल पंजाबी लस्सी करण्याची रेसिपी 

लस्सी करण्यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दही. पण एवढं लक्षात ठेवा की लस्सीसाठीचं दही खूप आंबट असू नये. ते ताजं आणि गोड असावं.

डायबिटिस असेल तर आंबा खायचाच नाही, कोण म्हणतं? पाहा मधूमेह असेल तर आंबा खाण्याची योग्य पद्धत..

आता एका भांड्यामध्ये दही घेऊन ते चांगलं फेटून घ्या. जेवढं दही असेल त्याच्या चौपट त्यात थंडगार पाणी किंवा दूध घाला आणि पुन्हा एकदा फेटून घ्या. दही आणि पाणी किंवा दही आणि दूध जर तुम्ही मिक्सरमधून फेटून घेतलं तर जास्त चांगलं. कारण त्याला मग छान फेस येतो आणि ती अगदी ढाब्यावर देतात तशी दिसते.

 

मिक्सरमधून लस्सी फेटून घेत असतानाच त्यात साखर आणि थोडं मीठ घालावं. त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड, बर्फाचे तुकडे घालून ती सर्व्ह करा.

काळ्या केसांसाठी कशाला महागड्या मेलॅनिनच्या गोळ्या खाता? ‘हे’ पदार्थ खा, म्हातारपणीही केस काळे

लस्सी ग्लासमध्ये भरतानाच ती अशा पद्धतीने ओतावी की वर सगळा फेस जमा होईल.. त्यानंतर त्यावर फेटलेली साय किंवा ताजं लोणी घाला. अस्सल पंजाबी स्टाईल लस्सी तयार... एकदा करून पाहा. जर प्लेन लस्सी आवडत नसेल तर अशी लस्सी करून त्यात गुलकंद, आंबा असे वेगवेगळे फ्लेवर घाला.

 

Web Title : ढाबा-शैली पंजाबी लस्सी: स्वादिष्ट गर्मी के पेय के लिए आसान रेसिपी

Web Summary : दही फेंटें, ठंडा पानी/दूध, चीनी, नमक और इलायची मिलाएं। झागदार होने तक ब्लेंड करें। प्रामाणिक पंजाबी लस्सी के लिए क्रीम/मक्खन के साथ परोसें।

Web Title : Dhaba-style Punjabi Lassi: Easy recipe for a delicious summer drink.

Web Summary : Beat yogurt, add cold water/milk, sugar, salt, and cardamom. Blend until frothy. Top with cream/butter for authentic Punjabi lassi.