Join us  

प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा करायचा ? शिरा भगराळा होऊ नये, गाठी राहू नये म्हणून सोप्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2023 4:50 PM

How To Make Prasadacha Sheera : प्रसादाचा शिरा परफेक्ट जमणं सोपं नाही, मात्र काही टिप्स लक्षात ठेवल्या तर ते सहज जमत...

घरी पूजा असली किंवा गणपती बाप्पाच्या नैवेद्याला, सत्यनारायण पूजेला आवर्जून बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे शिरा. इतरवेळी केला जाणारा शिरा आणि खास पूजेवेळी बनवला जाणारा शिरा काहीही म्हणा वेगळाच लागतो. प्रसादाचा शिरा खाल्ल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा शिरा खाण्याची इच्छा होत नाही. एरव्ही इतर दिवशी आपण कितीही प्रयत्न केले तरीही त्या शिऱ्याला प्रसादाच्या शिऱ्याची चव येत नाही(Prasadacha Sheera /Suji Halwa – Rich Semolina Sweet).

प्रसादाचा शिरा हा नैवेद्यासाठी उत्तम पदार्थ आहे. याशिवाय घरातील सगळेजण आवडीने हा शिरा खातात. प्रत्येकाची शिरा (Prasadacha sheera recipe) बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण परफेक्ट शिरा (Semolina Halwa) प्रत्येकालाच करायला जमतो असे नाही. कधी रवा व्यवस्थित भाजला जात नाही तर कधी तूप कमी पडतं, कधी शिरा कमी गोड बनतो. याचबरोबर शिरा(Prasad sheera recipe with banana) बनवताना काही छोट्या छोट्या चुका झाल्यामुळे शिरा आपल्याला हवा तसा बनत नाही. याचबरोबर काहीवेळा शिरा तयार झाल्यावर तो खूप पातळच होतो तर कधी त्याचे गठ्ठे तयार होतात. या सगळ्या चुका होऊ नयेत म्हणून शिऱ्याची (Satyanarayan Prasad Sheera) परफेक्ट रेसिपी व काही महत्वाच्या टिप्स(How to make Prasadacha Sheera).

साहित्य :- (सव्वा किलो शिऱ्यासाठी)

१. साजूक तूप - १ टेबलस्पून २. केळी - ४ (मध्यम आकाराची पिकलेली केळी)३. रवा - पाव किलो ४. तूप - २५० ग्रॅम ५. काजू व बदामाचे काप - १/२ कप६. मनुके - १/२ कप ७. दूध - पाव लिटर८. साखर - पाव किलो  ९. तुळशीची पाने - ५ ते ६ १०. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 

उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...

 सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त... 

कृती :- 

१. एका मोठ्या भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात पिकलेली केळी घालून ती मऊ, रवाळ होईपर्यंत शिजवून घ्यावीत. २. ही केळी तुपात शिजवून झाल्यावर एका वेगळ्या डिशमध्ये काढून ठेवून द्यावीत. ३. एक भांड घेऊन त्यात साजूक तूप घ्यावे, या तुपात रवा घालूंन तो खरपूस रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यावा. ४. रवा आणि तूप भाजून एकजीव झाल्यानंतर त्यात काजू, बदामाचे काप घालावेत. ५. शिऱ्याला गडद खरपूस बदामी रंग आला की त्यात मनुके घालावेत. 

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

ना उकड घ्यायचं टेंशन, ना सारणाची - ना तळणाची घाई ! गॅसही न पेटवता करता झटपट मोदक...

६. सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून तयार झाल्यावर त्यात गरम दूध घालावे. ७. दूध घातल्यानंतर हे सगळे दूध शिऱ्यात एकजीव करून घ्यावे. ८. आता या शिऱ्यात साखर, वेलची पूड, तुळशीची पाणी, तुपात परतून घेतलेली केळी घालावीत. ९. सगळे जिन्नस चमच्याने एकजीव करून शिऱ्यावर झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यावा.    

भजी - वडे एकदम गोल गरगरीत एकसारखे होण्यासाठी १ सोपी ट्रिक, सणावाराला करा उत्तम भजी - वडे...

टिप्स :- 

१. प्रसादात केळी घालताना पिकलेलीच केळी घालावीत. कच्ची केळी घातल्यास शिरा दीर्घकाळ न टिकता लवकर खराब होऊ शकतो. २. प्रसादासाठी शिरा बनवताना साजूक तूप, रवा, दूध, साखर या सगळ्या पदार्थांचे प्रमाण एकसारखेच असावे (पाव किलो रवा घेतल्यास तूप व दूध, साखर देखील तेवढ्याच प्रमाणात घ्यावे.) ३. शिरा बनवताना त्यात दूध घालताना ते दूध गरम करून मगच घालावे. गरम दुधाचा वापर केल्याने रवा फुलून येण्यास मदत होते. शक्यतो प्रसादाचा शिरा बनवताना गाईच्या दुधाचा वापर करावा. ४. शिऱ्यात साखर घातल्यानंतर तो जास्त शिजवू नये, असे केल्यास साखरेचा पाक तयार होऊन मग शिरा थंड झाल्यावर त्याचे गठ्ठे तयार होतात. ५. जर तुम्हाला केशर, केवडा किंवा गुलाबपाणी असे काही इसेन्स वापरायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये घालू शकता.

श्रावण स्पेशल : उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीअन्नगणेश चतुर्थी रेसिपी