Lokmat Sakhi >Food > उकडीचे की तळणीचे हा वाद विसरा, तुम्ही मोजून १० मिनिटांत करा पोह्यांचे मोदक-बाप्पासाठी खास पदार्थ

उकडीचे की तळणीचे हा वाद विसरा, तुम्ही मोजून १० मिनिटांत करा पोह्यांचे मोदक-बाप्पासाठी खास पदार्थ

poha modak recipe: Ganesh Chaturthi special sweets: 10 minute modak recipe: quick poha modak: पाहूया अवघ्या १० मिनिटांत बाप्पासाठी करता येतील असे मोदक.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2025 09:35 IST2025-08-30T09:30:00+5:302025-08-30T09:35:02+5:30

poha modak recipe: Ganesh Chaturthi special sweets: 10 minute modak recipe: quick poha modak: पाहूया अवघ्या १० मिनिटांत बाप्पासाठी करता येतील असे मोदक.

how to make poha modak in 10 minutes for Ganesh Chaturthi quick and easy modak recipe without steaming or frying | उकडीचे की तळणीचे हा वाद विसरा, तुम्ही मोजून १० मिनिटांत करा पोह्यांचे मोदक-बाप्पासाठी खास पदार्थ

उकडीचे की तळणीचे हा वाद विसरा, तुम्ही मोजून १० मिनिटांत करा पोह्यांचे मोदक-बाप्पासाठी खास पदार्थ

सध्या घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाच्या आवडीचे पदार्थ हमखास आपल्या घरी बनवले जातात. त्यातील बाप्पाला आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक.(Healthy Modak recipe) मोदकाचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मोदकाचे प्रकार देखील आहेत. उकडीचा, तळणीचा, माव्याचा किंवा विविध पिठांचा.(diet free mdak recipe) अनेकदा मोदक खाण्याची इच्छा फार होते पण अधिक गोड असल्यामुळे तो खाता येत नाही. लहान मुलांना किंवा मधुमेह असणाऱ्यांना गोडाचे पदार्थ जास्त प्रमाणात देता येत नाही.
मोदक खायला जितके आवडतात तितकेच करायला खूप मोठा घाट घालावा लागतो.(Modak recipe) एवढी मेहनत करुन मोदक मनासारखे झाले तर ठीक नाही तर आपला हिरमोड होतो. अनेकदा उकडीचे मोदक फसतात, फुटतात किंवा तळणीचे मोदक वातड होतात.(poha modak recipe) ज्यामुळे आपली चिडचिड वाढते. पण जर काही घरगुती पदार्थांपासून आपण झटपट पद्धतीने मोदक तयार करु शकतो. जे पौष्टिकही आणि कमी गोडाचे असतील. पाहूया अवघ्या १० मिनिटांत बाप्पासाठी करता येतील असे मोदक. 

Ganeshotsav 2025 : मोदकांसाठी उकड कशी काढावी? मोदकांच्या पिठीसाठी कोणता तांदूळ योग्य? लक्षात ठेवा ५ गोष्टी-मोदक परफेक्ट

साहित्य 

तीळ - १/२ कप
पोहे - पाव कप 
खोबऱ्याचा कीस - १/२ कप
शेंगदाणे -१/२ कप
गूळ - ३/४ कप
जायफळ पूड - चवीनुसार 
लवंग - ३ ते ४
वेलची पूड - चवीनुसार


कृती

1. सगळ्यात आधी पॅनमध्ये तीळ लालसर होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर पोहेसुद्धा थोडे लालसर भाजून घ्या. आता खोबऱ्याचा किस आणि शेंगदाणे देखील वेगवेगळ्या पद्धतीने भाजून घ्या. 

2. आता शेंगदाण्याची साले काढून घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले सर्व साहित्य, गूळ, किसलेली जायफळ, लवगं आणि वेलचीपूड घालून वाटून घ्या. 

3. वाटलेले सर्व मिश्रण एकजीव करुन मोदकाच्या साच्यात भरा. व्यवस्थित मोदकाला आकार द्या. तयार होईल पौष्टिक आणि कमी गोडाचा पोह्यांचा मोदक. 


Web Title: how to make poha modak in 10 minutes for Ganesh Chaturthi quick and easy modak recipe without steaming or frying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.