Join us

पोहे कडक होतात कधी गिळगिळीत? पोहे भिजवताना 'ही' वस्तू घाला, परफेक्ट बनतील पोहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 13:02 IST

How To Make Perfect Poha : नाश्त्यापासून मुलांना टिफिन देण्यापर्यंत पोहे आवडीने खाल्ले जातात.

पोहे खायला सर्वांनाच आवडते. पोहे हा भारताचा लोकप्रिया नाश्ता आहे.  भारतीय घरांमध्ये आवडीने पोहे खाल्ले जातात. पोहे आणि चहा सकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट मेन्यू आहे. (Poha Making Tips) पोहे एक महाराष्ट्रीयन व्यंजन आहे. महाराष्ट्रातील  प्रत्येक घरांत आवडीने पोहे खाल्ले जातात. नाश्त्यापासून मुलांना टिफिन देण्यापर्यंत पोहे आवडीने खाल्ले जातात. (How to Make Poha Perfect) या टिप्सचा वापर केल्याने पोहे सॉफ्ट आणि फ्लफी होतील. 

पोहे बनवताना लोक चूक करतात पोहे भिजवताना आणि धुताना व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. पोहे पाण्याने २ ते ३ वेळा धुवून घ्या त्यानंतर थोड्यावेळासाठी पाणी निथळत ठेवा.  (Cooking Hacks & Tips) पोह्यांमध्ये थोडं पाणी ठेवा.  जेणेकरून पोहे सॉफ्ट आणि मऊ होतील.  (Poha Making Tips  At Home)

 

५ ते ७ मिनिटांनी पोह्यांमध्ये मीठ, हळद, लिंबाचा रस, साखर आणि एक चिमुट हिंग घालून मिक्स करा, पोह्यांमध्ये मीठ, लिंबाचा रस, साखर आणि चिमुटभर हिंग घालण्याची एक ट्रिक आहे. त्यानंतर तेलात जीरं, कढीपत्ता,  शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा,  बटाटा घालून भाजून घ्या. कांदा आणि बटाटा भाजल्यानंतर पोहे व्यवस्थित मिक्स करा त्यात  कोथिंबीर घालून सर्व्ह करा. धुतलेल्या पोह्यांमध्ये मीठ घाला, ज्यामुळे चव वाढवण्यास मदत होईल. 

पोहे करताना या चुका टाळू नका

१) पोहे जास्तnवेळेसाठी पाण्यात  भिजवून ठेवू नका.

२) पोहे धुतल्यानंतर ३ ते ४ पाण्यातून गाळून घ्या. जेणेकरून पोहे मऊ राहतील.

३)  पोह्यांना तडका देताना कढईत साहित्य घातल्यानंतर लगेच पोहे त्यात घाला. पोहे करताना कांदे जास्त भाजू नका किंवा कच्चेही ठेवू नका. अन्यथा पोह्यांची चव खास लागणार नाही.

४)  पोहे अधिक पौष्टीक होण्यासाठी तुम्ही त्यात शेंगदाणे घालू शकता. काहीजण शेंगदाण्यांमध्ये काजूसुद्धा घालतात.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.