Join us

मसालेदार भाजी होईल झणझणीत, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात खास ३ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 13:11 IST

Food And Recipe: मसालेदार भाजी करताना सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapur) यांनी सांगितलेल्या या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा... भाजी (How to make perfect gravy for spicy sabji) अशी चवदार होईल की चाखून दिल खुश हो जायेगा...

ठळक मुद्देथोड्याशा ट्रिक्स वापरून मसालेदार भाजीची ग्रेव्ही आणखी झणकेदार कशी करायची, याची ही कुणाल कपूर यांनी सांगितलेली खास पद्धत.

दररोजच्या साध्या, कमी तिखट- मीठ असणाऱ्या भाज्या खाऊन कधीतरी कंटाळा येतोच आणि मग आठवड्यातून एकदा एखादी मस्त चवदार, झणझणीत, मसालेदार भाजी (how to make delicious spicy sabji?) खाण्याचा मुड होतो. पंजाबी स्टाईलची भाजी असो किंवा मग आपल्या पारंपरिक रस्सा भाज्या. अनेक भाज्यांची ग्रेव्ही (how to make tasty gravy for sabji?) करण्यासाठी कांदा आणि टोमॅटो हे दोन बेसिक पदार्थ तर वापरले जातातच. आता हेच २ पदार्थ आणि त्यांच्या जोडीला थोड्याशा ट्रिक्स वापरून मसालेदार भाजीची ग्रेव्ही आणखी झणकेदार कशी करायची, याची ही कुणाल कपूर यांनी सांगितलेली खास पद्धत. (Special tips by Kunal Kapur for preparing gravy)

 

मसालेदार भाज्यांसाठी कांदा- टोमॅटो ग्रेव्ही करताना...- अनेक जणी ग्रेव्ही तयार करताना कांदा- टोमॅटो आधी कच्चे मिक्सरमधून वाटून घेतात आणि नंतर ते परतून घेतात. पण यापेक्षा कुणाल कपूर यांनी सांगितलेली पद्धत थोडी वेगळी आहे. आधी परतून घ्या आणि नंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या, असा त्यांचा फॉर्म्यूला आहे. - त्यासाठी सगळ्यात आधी कढई गॅसवर तापायला ठेवा. त्यात तेल टाका आणि तेल तापल्यानंतर जिरे- हिंग टाकून फोडणी करून घ्या.- आता त्यामध्ये थोडा मोठा- मोठा चिरलेला कांदा टाका आणि तो व्यवस्थित परतून घ्या.

- कांद्याचा रंग बदलला की त्यात गरम मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, छोले मसाला हे सगळे मसाले समान प्रमाणात टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून परतून घ्या.- नंतर त्यात थोडासा चाट मसाला आणि थोडं काळं मीठ टाका.- आता कांदा आणि मसाले एकजीव झाले की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाका. कांद्याच्या फोडी मोठ्या असतील तरी चालतील, पण टोमॅटो मात्र बारीक चिरावा.- टोमॅटो चांगला परतून घ्या. टोमॅटो परतून घेत असताना गॅस नेहमी मध्यम ते मोठा या प्रमाणात ठेवा.

- टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यात थोडं मीठ टाका आणि गॅस कमी करून कढईवर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या.- टोमॅटोचा कच्चा वास निघून गेला आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून कांद्यासोबत एकजीव झाले की गॅस बंद करा.- ही ग्रेव्ही थोडी थंड झाली की मिक्सरमधून वाटून घ्या. वाटून घेताना त्यात थोडंसं पाणी टाका.- अशी ग्रेव्ही जेव्हा तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीसाठी वापराल तेव्हा ती भाजी निश्चितच अधिक चवदार होईल, असं कुणाल कपूर सांगत आहेत. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूर