Join us

भटुरे खूप तेलकट होतात- टम्म फुगतच नाही? २ सोप्या ट्रिक्स, खा मस्त कुरकुरीत छोले भटुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 11:29 IST

crispy bhature at home: chole bhature cooking tips: काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर भटुरे तेलकट होणार नाहीत तसेच फुगतील ही आणि कुरकुरीत होतील.

पावसाळ्यात आपल्या गरमागरम आणि चमचमीत पदार्थ नेहमीच खायला आवडतात.(bhature recipe ) अशावेळी बटाटा भजी, कांदा भजी, वडापाव यांसारखे अनेक तळलेले पदार्थ खातो. नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो.(Cooking tips) आपण अनेकदा रोड साईड ढाब्यावर गेलो की तिथे छोले-भटुरे हमखास पाहायला मिळतात. हा पदार्थ पंजाबमध्ये लोकप्रिय असला तरी भारतात अनेक ठिकाणी याची लोकप्रियता वाढली आहे.(how to make perfect bhature) सध्या प्रत्येक हॉटेल-ढाबा किंवा स्ट्रीट साइडला छोले-भटुरे सहज मिळतात. अनेकदा ही रेसिपी आपण घरी ट्राय करायला बघतो. परंतु, छोले तर चविष्ट बनतात पण भटुरे मात्र खूप तेलकट होतात इतकेच नाही तर ते फुगत देखील नाही.अशावेळी नेमके काय करावं आपल्याला सुचत नाही. पण काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर भटुरे तेलकट होणार नाहीत तसेच फुगतील ही आणि कुरकुरीत होतील.(Indian street food recipes) 

Ashadhi Ekadashi Food : साबुदाणा खिचडी-पराठा खाऊन वैतागलात? करा उपवासाचे स्पेशल पॅटीस, मऊ-लुसलुशीत पौष्टिक पदार्थ

1. भटुरे बनवताना पीठ योग्य पद्धतीने मळायला हवे. भटुरे बनवण्यासाठी रवा आणि मैदा समप्रमाणात घ्या. पीठात थोडे तेल आणि दही वापरा. ज्यामुळे भटुरा मऊ आणि कुरकुरीत होण्यास मदत होईल. 

2. पीठ मळताना सगळ्यात आधी बारीक रवा, रिफाइंड पीठ, मीठ, थोडी साखर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिसळा. त्यात एक वाटी दही घाला. थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. तयार पीठामध्ये तेल घालून झाकून ठेवा. पीठ मळल्यानंतर ६ ते ७ तास तसेच राहू द्या. 

3. पीठ चांगले फुगल्यानंतर त्याचे गोळे बनवा. गोल आकारात चपातीसारखे लाटून घ्या. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात भटूरा टाका आणि तळा. भटूरा फुग्यासारखा फुगेल. 

4. भटुरे तळताना तेल पुरेसे गरम असणे देखील महत्त्वाचे आहे. तेल थंड असल्यास किंवा व्यवस्थित गरम न झाल्याने ते तेल अधिक पितात. ज्यामुळे तेलकट होतात. तेल व्यवस्थित गरम झाले आहे की, नाही हे तपासण्यासाठी पीठाचा छोटासा तुकडा तेलात घाला जर तो लगेच वर आला तर तेल चांगले गरम झाले आहे असे समजावे. पण जर तो हळूवारपणे वर आला तर तेल अजून चांगले गरम व्हायला हवे. 

5. तेल गरम झाल्यावर मंद आचेवर भटुरे तळा. ज्यामुळे ते चांगले फुगतील आणि जास्त तेलकट होणार नाही. भटुरे तळल्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवा. ज्यामुळे जास्तीचे तेल शोषले जाईल आणि भटुरे कमी तेलकट होतील. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती