Join us

भाकरी थापताच तुटून जाते, जाड- वातड होते? परफेक्ट भाकऱ्या जमण्यासाठी ४ टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2025 09:30 IST

How To Make Perfect Bhakari: बऱ्याच जणींना चांगल्या भाकऱ्या करता येत नाहीत. म्हणूनच या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी येऊ शकतात..(simple tips and tricks for making perfect jowar roti)

ठळक मुद्देपरफेक्ट भाकरी कशी करावी, याविषयी या काही टिप्स पाहाच..

पोळ्या किंवा चपात्या खाण्यापेक्षा ज्वारीची भाकरी खाणं अधिक आरोग्यदायी असतं असं अनेक डॉक्टर सांगतात. वेटलॉससाठीही गव्हाच्या चपात्यांऐवजी ज्वारीची, बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण पोळ्या करण्याचा ज्यांना खूप सराव असतो, अशा अनेक महिलांनाही भाकरी मात्र करता येत नाही. कारण भाकरी आणि पोळ्या करण्याचं तंत्र एकदमच वेगळं आहे. भाकरी करायला गेलं की ती तुटते, थापताना नाही तुटली तरी भाजताना तव्यावर टाकली की तिचा तुकडा पडतो (How To Make Perfect Bhakari?). किंवा भाकरी अगदीच जाड, वातड होते.. असं तुमचंही होत असेल तर परफेक्ट भाकरी कशी करावी, याविषयी या काही टिप्स पाहाच..(simple tips and tricks for making perfect jowar roti) 

 

उत्तम भाकरी करण्यासाठी टिप्स..

१. गव्हाचं पीठ आपण जास्तीचं दळून आणतो आणि ते १५ ते २० दिवस वापरतो. पण ज्वारीच्या पिठाचं तसं नसतं. हे पीठ जेवढं ताजं दळून आणलेलं असतं, तेवढी त्याची भाकरी परफेक्ट जमते. त्यामुळे ज्यांना भाकरी करण्याची खूप सवय नाही त्यांनी नेहमी नुकत्याच दळून आणलेल्या पिठाच्या भाकऱ्या कराव्या. 

पावसाळ्यात घरात गोम, गांडूळ निघतात? ४ उपाय- गोम येण्याचा धोका कायमचा टळेल

२. जेवढ्या पोळ्या करायच्या असतात तेवढी कणिक आपण एकदाच मळून ठेवतो. पण भाकरीच्या पिठाचं तसं नसतं. प्रत्येक भाकरीचं पीठ थोडं थोडं ताटात घ्या आणि पाणी घालून ते मळून घ्या. जेवढं जास्त तुम्ही ते मळून घ्याल तेवढी भाकरी मऊ आणि चांगली होईल.

 

३. सुरुवातीला भाकरी थापताना पिठाचा गोळा खूप मोठा घेऊ नका. छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या भाकरी करा. सुरुवातीला पुरीपेक्षा थोडी मोठ्या आकाराची भाकरी जमली तरी चालेल. जेणेकरून ती तुटणार नाही.

अंकिता लोखंडेच्या पार्टीत उषा नाडकर्णी झाल्या भावूक, म्हणाल्या घरी राहण्याची भीती वाटते, कारण...

४. तव्यावर भाजण्यासाठी टाकलेली भाकरी उलटण्याची घाई करू नका. जेव्हा खालच्या बाजुने ती पुर्णपणे भाजली जाते तेव्हा आपोआप ती तव्यापासून वेगळी होते आणि लवकर उलटली जाते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती