पाणीपुरी हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. पण पावसाळा असेल तर रस्त्यावरची पाणीपुरी खायला नको वाटते. आता तीच पाणीपुरीची चटक तुम्ही एका अफलातून चवीच्या चिवड्यामार्फत भागवू शकता. मुरमुऱ्याचा चिवडा करताना जर त्यात थोडे वेगळे पदार्थ टाकले तर घरच्याघरी तुम्ही अतिशय खमंग असा पाणीपुरी चिवडा करू शकता. संध्याकाळी जेव्हा थोडीशी भूक लागते, तेव्हा तोंडात टाकायला हा चिवडा बरा असतो (How To Make Panipuri Chivda at Home?). शिवाय मुलांना कधी कधी नाश्त्याच्या डब्यात देण्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे.(panipuri flavour chivda recipe)
पाणीपुरी फ्लेवर चिवडा कसा करायचा?
पाणीपुरी चिवडा कसा करायचा याची रेसिपी nikiiceipe या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
४ ते ५ कप मुरमुरे
१ कप पुदिन्याची पानं
गौरी गणपतीसाठी घर आवरायचंय; पण वेळच नाही? ५ टिप्स- अवघ्या काही तासांतच घर होईल चकाचक
१ कप कोथिंबीर
५ ते ६ हिरव्या मिरच्या
पाव कप कडिपत्त्याची पानं
३ ते ४ टेबलस्पून शेंगदाणे
मसाल्यासाठी हळद, काळं मीठ, जिरेपूड, आमचूर पावडर, चाट मसाला, मीठ, पिठीसाखर हे सगळं प्रत्येकी एकेक टी स्पून
२ टेबलस्पून तेल
१ कप बारीक शेव
कृती
हा उपाय करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यानंतर मुरमुरे त्यामध्ये टाकून हलकेसे भाजून घ्या.
यानंतर एक छोटी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घालून शेंगदाणे, कोथिंबीर, पुदिना, कडिपत्ता, हिरव्या मिरच्या घालून तळून घ्या. आता तळून घेतलेले सगळे पदार्थ थंड होऊ द्या.
थंड झालेले पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्या. यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तयार केलेली पेस्ट त्या तेलामध्ये थाेडी तळून घ्या.
वजन वाढू नये म्हणून जे टाळता; तेच खाऊन करिनाने 'झीरो फिगर' मिळवली होती! वाचा खास गोष्ट
आता एका मोठ्या भांड्यामध्ये मुरमुरे घ्या. त्यात तळून घेतलेल्या पदार्थांची पेस्ट टाका. आता त्यातच शेंगदाणे आणि बाकीचा सगळा मसाला घाला. सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्या. पाणीपुरी फ्लेवरचा चटपटीत मुरमुरा चिवडा तयार..