Join us

उन्हाळ्यात करा विकतसारखे ऑरेंज पॉप्सिकल, कमी साहित्यात १० मिनिटात - गारेगार पॉप्सिकल रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2023 12:25 IST

How to Make Orange Popsicles Recipe at Home विकतचे आईस्क्रीम कशाला, घरीच करा ऑरेंज पॉप्सिकल, शरीराला मिळेल थंडावा..

उन्हाळा सुरु झाल्यानंतर थंड - थंड पदार्थ खाण्याची चटक लागते. थंड पेय व गारेगार आईस्क्रीममुळे उन्हाळा आनंदात जातो. लहानग्यांपासून थोरा - मोठ्यांपर्यंत अनेकांना आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते. आईस्क्रीम २ प्रकारचे असतात. एक दुधाची तर, दुसरी फ्लेवर्ड बर्फाची असते. बर्फाच्या आईस्क्रीमला पॉप्सिकल असे देखील म्हणतात.

लहानमुलं पॉप्सिकल आवडीने खातात. पण विकतचे पॉप्सिकल शरीरासाठी घातक ठरू शकतात. काही पॉप्सिकलमध्ये केमिकल रसायनांचा वापर केला जातो. व दुषित पाण्याचा देखील वापर होतो. विकतचे पॉप्सिकल खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी कमी साहित्यात पॉप्सिकल करू शकता. चला तर मग या टेस्टी रंगी - बेरंगी ऑरेंज पॉप्सिकलची कृती पाहूयात(How to Make Orange Popsicles Recipe at Home).

ऑरेंज पॉप्सिकल करण्यासाठी लागणारं साहित्य

रसना, टँग किंवा संत्र्याचा रस

साखर

पाणी

२ कांदे - मुठभर शेंगदाण्याची करा चवदार चटणी, चव अशी की भाजी खायला विसराल

लिंबाचा रस

अशा पद्धतीने करा ऑरेंज पॉप्सिकल

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी व साखर मिसळून साखरेचं पाणी तयार करून घ्या. साखर पाण्यात विरघळल्यानंतर त्यात रसना, टँग किंवा संत्र्याचा रस घालून मिक्स करा. मिश्रण पाण्यात मिक्स झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा मिश्रण चमच्याने मिक्स करा.

संपूर्ण साहित्य पाण्यात मिसळल्यानंतर, एका चाळणीतून हे संत्र्याचं मिश्रण एका वाटीमध्ये गाळून घ्या. दुसरीकडे एक आईस्क्रीम मोल्ड घ्या. त्या मोल्डमध्ये  ऑरेंज पॉप्सिकलचं मिश्रण घालून फ्रिजमध्ये ७ ते ८ तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवा.

आंबट - गोड चवीचं करा थंडगार कोकम सरबत, कमी वेळात - झटपट सरबत रेडी..

अशा प्रकारे ऑरेंज पॉप्सिकल खाण्यासाठी रेडी, आपण या पॉप्सिकलमध्ये ऑरेंज व्यतिरिक्त इतरही फळांचा ज्यूस मिक्स करू शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशल