आजकाल प्रत्येकाला थकवा, कमजोरी, आळस, केस गळणे, त्वचा निस्तेज होणे यांसारख्या समस्या देखील जाणवतात. कामाचा ताण, चुकीची जीवनशैली, झोपेची कमतरता, बाहेरचे खाणं आणि पोषणाचा अभाव हे सगळं आपलं शरीर दिवसेंदिवस कमकुवत करतं.(Homemade multivitamin powder) अशावेळी लोकांची पहिली पसंती महागडी मल्टीविटामिन औषधे, प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट्स. पण या सप्लिमेंट्समध्ये केमिकल्स, प्रेझर्व्हेटिव्ह्ज असतात.(Budget multivitamin recipe) जे काही वेळेस शरीराला चांगले नसतात.त्यातून डोस चुकला तर ऍसिडिटी, डोकेदुखी, त्वचेचे दुष्परिणामही जाणवू शकतात.
पण आपल्याकडे घरातच असे अनेक घटक आहेत जे नैसर्गिक मल्टीविटामिनचा खजिना आहेत.(Natural immunity booster) हे पदार्थ एकत्र करून बनवलेली मल्टीविटामिन पावडर शरीराला नैसर्गिक ताकद देते, इम्युनिटी वाढवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे कोणतेही साइड इफेक्ट्स नसतात. शिवाय हे बनवण्यासाठी ना फार वेळ लागतो, ना मोठा खर्च. ही पावडर घरीच कशी बनवायची हे पाहूया.
कुठल्याही पार्टीत मिळेल फुल अटेंशन, दिसाल क्लासी, पाहा ५ ड्रेस- व्हा पार्टी की शान
साहित्य
अळशी - १०० ग्रॅम
भोपळ्याच्या बिया - १०० ग्रॅम
सूर्यफूल बिया - १०० ग्रॅम
तीळ - १०० ग्रॅम
चिया सीड्स - १०० ग्रॅम
कृती
1. सगळ्यात आधी सर्व बिया स्वच्छ करुन मंद आचेवर २ ते ३ मिनिटे भाजून घ्या. बियांचा वास येऊ लागला की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
2. आता मिक्सरमध्ये बिया वाटून त्याची पावडर तयार करा. तयार होईल मल्टीविटामिन पावडर. हवाबंद काचेच्या डब्यात भरा. ही पावडर महिनाभर टिकते.
3. ही पावडर १ ते २ चमचे पुरेशी असते. आपण ही पावडर स्मूदी, मिल्कशेक, सूप, दलिया, खिचडी किंवा चपातीच्या पिठामध्ये मिसळून खाऊ शकता.
4. या बियांमध्ये ओमेगा-३, लिग्नान्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यात असणारे व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये ओमेगा-३, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.
