Join us

घरच्याघरीच तयार करा पौष्टिक मल्टीग्रेन आटा! विकत महागडं पीठ आणायची गरजच नाही, घ्या सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2025 18:22 IST

How to Make Multigrain Atta at Home: मल्टीग्रेन आटा घरच्याघरीच तयार करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..

ठळक मुद्दे कुटूंबातल्या लोकांच्या संख्येनुसार हे प्रमाण कमी- जास्त करू शकता.  

हल्ली वाढत्या वजनाचा त्रास अनेकांना होतो आहे. आपल्या आजुबाजुला आपण असे कित्येक लोक पाहातो जे वजन कमी करण्यासाठी किंवा आहे ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. बदललेली जीवनशैली हे देखील त्यामागचं कारण आहेच. त्यामुळे सध्या आहाराबाबतही अनेक लोक जागरुक झालेले आहेत. आहारतज्ज्ञांच्या मते गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेन जास्त असतं. त्यामुळे ते वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या पोळ्या किंवा बाजरी, ज्वारीच्या भाकरी अशा एकाच धान्यापासून तयार केलेल्या चपात्या किंवा भाकरी खाण्यापेक्षा वेगवेगळी धान्ये एकत्र करून त्यांचं पीठ करा आणि मल्टीग्रेन आटा खा असं तज्ज्ञ सांगतात. हे मल्टीग्रेन आटा अतिशय महाग मिळतं. म्हणूनच घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने ते कसं तयार करायचं ते पाहा..(how to make multigrain atta at home?)

 

घरच्याघरी मल्टीग्रेन आटा कसा तयार करायचा?

मल्टीग्रेन आटा तयार करण्यासाठी गव्हासोबतच बाजरी, नाचणी, ज्वारी, ओट्स, हरबरे असे सगळे पदार्थ घेतले जातात. या पदार्थांमुळे शरीराला चांगल्या प्रमाणात फायबर, प्रोटीन्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात.

तेल न लावताही केस लगेचच ऑईली होतात? वाचा कारण- केस देतात बिघडलेल्या तब्येतीविषयी संकेत

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच हृदयाचे आरोग्य जपण्यासाठीही मल्टीग्रेन आटा उपयुक्त ठरतो.

 

मल्टीग्रेन आटा तयार करण्यासाठी गहू साधारण २ किलो घ्या. त्यामध्ये ज्वारी अर्धा किलो, बाजरी अर्धा किलो, नाचणी पाव किलो घाला. आता यामध्येच आपल्याला पाव किलो हरबरा डाळ आणि पाव किलो ओट्स घालायचे आहेत. मल्टीग्रेन आटा तयार करण्यासाठी तुम्ही यामध्ये पाव किलो मकाही घालू शकता.

रोज 'या' पद्धतीने विड्याचं पान खा- तब्येतीच्या कित्येक तक्रारी कमी होऊन सौंदर्यही खुलेल

आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि गिरणीतून दळून आणा. या पिठामध्ये थोडी मुगाची डाळ घातली तरी चालेल. या मिश्रणातून साधारण ४ किलो मल्टीग्रेन आटा तयार होतो. जो तुम्ही महिनाभर खाऊ शकता. कुटूंबातल्या लोकांच्या संख्येनुसार हे प्रमाण कमी- जास्त करू शकता.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Make nutritious multigrain flour at home; easy recipe provided!

Web Summary : Avoid costly store-bought flour! Make healthy multigrain atta easily at home. Combine wheat, millet, sorghum, finger millet, oats, and chickpeas for fiber, protein, and minerals. This flour aids blood sugar control and heart health. Grind together and enjoy!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.