गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी आता प्रत्येक घरोघरी जोरदार सुरु असेलच. गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. उकडीच्या मोदकांशिवाय गणपती बाप्पाचा नैवेद्य आणि प्रसादाची थाळी पूर्ण होऊच शकत नाही. पांढरेशुभ्र मोदक आणि (How To Make Modak Saran) त्यात गुळ-खोबऱ्याचे रसरशीत, लुसलुशीत सारण... या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटते. मोदक उकडीचे असोत किंवा तळणीचे जेव्हा (Modak Saran Recipe) मोदकाचे सारण चवीला छान होते तेव्हा मोदक खायला आणखीनच छान लागतात. मोदकाचे सारण मोदकाची अस्सल (Perfect Modak Stuffing) चव वाढवण्यास मदत करते. जर हे सारण खूप चिकट, कडक किंवा कमी गोड असेल तर मोदक चवीला चांगले लागत नाहीत( how to make modak saran).
उकडीच्या मोदकांचे सारण जर एकदम परफेक्ट, चविष्ट आणि सुग्रास झाले तर उकडीचे मोदक चवीला रुचकर झालेच म्हणून समजा. उकडीचे मोदक तयार करणे सोपे काम नाहीच, त्याचे सारण परफेक्ट तयार करणे हेच एक मुख्य काम असते. जर सारण परफेक्ट चवीला झाले नाही, तर मोदक बिघडू शकतात किंवा बेत फसू शकतो. अनेक गृहिणींना उकडीच्या मोदकांचे सारण करायचे म्हणजे थोडे टेंन्शनच येते, कारण सारण कधी फारच कडक होते तर कधी खूपच सैलसर होते. सारण बिघडले तर मोदक खायला फारसे चांगले लागत नाहीत. यासाठीच, सारण न चुकता अगदी परफेक्ट तयार व्हावे यासाठी त्याची पारंपरिक रेसिपी आणि काही सोप्या टिप्स पाहूयात.
साहित्य :-
१. ओलं खोबरं - २ कप (नारळ खवून घेतलेला)२. साजूक तूप - २ टेबलस्पून३. गूळ - २ कप ४. ड्रायफ्रुटस काप - १/२ कप (आवडीनुसार)५. खसखस - १ टेबलस्पून (भाजून घेतलेली)६. वेलची पूड - १/२ टेबलस्पून
बेधूंद कोसळणाऱ्या पावसात भजी खा पोटभर, ५ टिप्स- तेल न पिता भजी होतील कुरकुरीत खमंग...
साचा न वापरताच करा उकडीचे कळीदार मोदक, पाहा सोपी पद्धत-सुंदर मोदक करा सहज...
कृती :-
१. सर्वातआधी नारळ फोडून घ्यावा, नारळ खवूंन ताज ओलं खोबरं एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावे. २. एका कढईत साजूक तूप घेऊन त्यात किसलेलं ओलं खोबरं हलकेच परतून घ्यावे. खोबरं २ ते ३ मिनिटे हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यावे. ३. खोबरं चांगलं परतवून घेतल्यावर त्यात किसलेला गूळ, भाजलेली खसखस, ड्रायफ्रुट्सची बारीक पूड किंवा काप घालावेत. ४. कढईतील सारण शिजून कढईच्या कडा सोडू लागले की सारण तयार झाले असे समजावे.
मोदकाचे सारण तयार करताना लक्षात ठेवा...
१. खोबरं गुळाचं सारण तयार करताना जितक खोबरं असेल तितकेच गूळ घ्यावे. गूळ, खोबरं दोन्हीही सम प्रमाणात घ्यावे.
२. सारण तयार करण्यापूर्वी एक तास आधी गूळ, ओलं खोबरं एकत्रित मिक्स करून ठेवावे. यामुळे सारण चांगले एकजीव होते आणि सारणाची पटकन शिजते.
३. सारण शिजवताना ते नेहमी मंद आचेवरच शिजवावे.
४. सारण शिजत असताना त्यात २ टेबलस्पून तूप घालावे यामुळे सारणाला एक प्रकारची चमक येते आणि सारण शिजताना खाली लागत नाही.
५. सारण एकदम कोरडे किंवा ओलसर साधारण मध्यम कंन्सिस्टंन्सीचे सारण करावे.