Join us

४ दिवस टिकणारे मेथीचे थेपले- सहलीला घेऊन जाण्यासाठी पौष्टिक पदार्थ- नाश्त्यासाठीही परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 09:20 IST

Gujarati Style Methi Theple Recipe: प्रवासाला जाताना मुलांसाठी काही घरगुती पदार्थ घेऊन जायचे असतील तर गुजराती पद्धतीचे मेथीचे थेपले हा एक योग्य पर्याय असू शकतो.(how to make methi theple?)

ठळक मुद्देहा पदार्थ भरपूर दिवस चांगला टिकतो.

सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे अनेकजण सहकुटूंब प्रवासाला निघतात. कधी कधी रेल्वेचा, बसचा प्रवास खूप लांबचा असतो. त्यामुळे बराच वेळ गाडीत बसून राहावे लागते. अशावेळी बाहेर काही चांगले खायला मिळेल याची खात्री नसते. म्हणूनच घरचे काही पदार्थ आवर्जून सोबत घेतले जातात. लहान मुलं सोबत असतील तर हमखास घरगुती पौष्टिक सोबत घ्यावेच लागतात (how to make methi theple?). चिवडा, लाडू असं तर आपण करून घेतोच (gujarati style methi theple recipe). पण त्यासोबतच तुम्ही मेथीचे थेपलेही घेऊ शकता. हा पदार्थ भरपूर दिवस चांगला टिकतो.(methi theple recipe in Marathi)

मेथीचे थेपले कसे करायचे?

 

साहित्य

दोन वाट्या बारीक चिरलेली मेथी

हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर यांचे बारीक वाटण साधारण २ ते ३ टेबलस्पून

२ वाट्या कणिक

कळकट -घाणेरडा कंगवा झटपट स्वच्छ करण्याच्या पाहा २ मस्त देसी जुगाडू पद्धती, कंगवा दिसेल नवाकोरा

अर्धी वाटी बेसन पीठ

१ टीस्पून हळद

१ टीस्पून ओवा

१ टेबलस्पून तीळ

२ कप ताक

 

कृती

मेथीचे थेपले करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घालून मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे यांचे वाटण व्यवस्थित परतून घ्या. हे वाटण परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली मेथी घालून ती देखील परतून घ्या. 

 

आता एका मोठ्या भांड्यात कणिक आणि बेसन पीठ एकत्र करा. त्यात ओवा, मीठ, हळद, तिखट, तीळ आणि परतून घेतलेली मेथी घाला.

अबब! नीता अंबानींची ३. ५ कोटींची साडी!! सोन्याच्या साडीवर सजली अस्सल हिऱ्यांची नक्षी ... 

हळूहळू त्यामध्ये ताक घालून हे पीठ भिजवा. पीठ भिजवल्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि १० ते १५ मिनिटे ते व्यवस्थित सेट होऊ द्या. यानंतर  नेहमीप्रमाणे त्याचे पराठे लाटा आणि तव्यावर खमंग भाजून घ्या. गरमागरम मेथीचे थेपले तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.गुजरात