मसूर आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स तर असतातच. पण त्यासोबतच शरीरासाठी उपयुक्त ठरणारे अमिनो ॲसिड, फायबर आणि त्यासोबतच वेगवेगळे व्हिटॅमिन्स, खनिजेही असतात. त्यामुळे मसूरची डाळ किंवाा मसूर आपल्या आहारात नियमितपणे असायलाच हवेत. आता मसूरची उसळ आणि भात किंवा मग मसूर डाळीचे वरण आणि भात असं वेगवेगळं खाण्यापेक्षा हे दोन्ही एकत्र करा आणि एखाद्या वेळी मसूर पुलाव ही रेसिपी ट्राय करा (How To Make Masoor Pulao?). वन डिश मील म्हणून हा पदार्थ अगदी उत्तम आहे.(perfect one dish meal option for lunch or dinner )
मसूर पुलाव रेसिपी
साहित्य
तांदूळ आणि मसूर डाळ प्रत्येकी दिड- दिड कप
३ टोमॅटो आणि २ कांदे अगदी बारीक चिरलेले
आलं आणि लसूण पेस्ट प्रत्येकी एकेक चमचा
गौराईला घाला पारंपरिक दागिन्यांचा साज- ५ ठसठशीत देखणे दागिने घरच्या गौरींसाठी घ्यायलाच हवे
नारळाचं दूध १ कप
तूप ३ टेबलस्पून
२ तेजपान, १ इंच दालचिनी, १ दगडफूड, ३ हिरवी वेलची, ५ लवंग, ८ ते १० मिरे
हळद, लाल तिखट, हिरव्या मिरच्या, गरम मसाला, मीठ चवीनुसार.
कृती
सगळ्यात आधी गॅसवर कुकर गरम करायला ठेवा. गरम झालेल्या कुकरमध्ये तूप घालून वेलची, लवंग, मिरे, तेजपान, दालचिनी, दगडफूल असं सगळं घालून हलकं परतून घ्या. यानंतर बारीक चिरलेला कांदा, आलं- लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या.
कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड खूप वाढलं? ओव्याची पानं 'या' पद्धतीने खा- कित्येक आजारांवर सोपा उपाय
कांदा हलकासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घाला. लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून सगळं व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. यानंतर त्यामध्ये हलकेसे उकडून घेतलेले मसूर आणि स्वच्छ धुतलेले तांदूळ घाला. पुन्हा एकदा सगळं हलवून घ्या.
त्यामध्ये नारळाचं दूध, पाणी, तिखट, मीठ घाला आणि त्यावर झाकण ठेवून तांदूळ, मसूर शिजवून घ्या. नारळाचं दूध नसेल तरी चालते. मसूर आणि तांदूळ शिजल्यानंतर गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम मसूर पुलाव रायत्यासोबत छान लागतो.